खांबेच्या शाळेत हळदी कुंकू व माता पालक मेळावा मोठ्या उत्साहात
वरवंडी (संपत भोसले) संगमनेर तालुक्यातील खांबे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकताच स्त्रीचा सन्मान करत,हळदी कुंकू कार्यक्रम व माता पिता मेळावा उत्साहात पार पडला.
प्रसंगी खांबे गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच रविंद्र दातीर शाळा समितीचे अध्यक्ष.संदीप जोरी उपाध्यक्ष सौ.संगिता गायकवाड शिक्षण तज्ञ.भाऊसाहेब शिंदे .रामेश्वर शिंदे.मंगेश शेंडगे रावसाहेब शिंदे गोपीनाथ शिंदे राजू बिडवे तथा सर्व सदस्य व ग्रामस्थ व माता पालक बहुसंख्येने उपस्थित होते
सध्याच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा विरंगुळा म्हणून शाळेमध्ये चमचा लिंबू स्पर्धा उखाणे व संगीत खुर्ची अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्व मातापालकांनी बहुसंख्येने यामध्ये उत्स्फूर्तपणें सहभाग नोंदविला.
प्रसंगी शाळेत होत असलेले उपक्रम व मुलांची गुणवत्ता याबद्दल माता पालकांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका श्रीमती सुवर्णा शेटे यांनी केले.तर कारभारी कापडी दिपक गोफने तसेच युवा प्रशिक्षणार्थी अविनाश शिंदे यांचे सहकार्य लाभले शाळेचे मुख्याध्यापक.दत्तात्रय सासवडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब गुंड विस्ताराधिकारी कल्याण राऊत तसेच केंद्रप्रमुख विनायक भोसले यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
