तळेगाव दिघे (प्नतिनिधी) संगमनेर तालुक्यातील तिगाव येथील अमोल संजय तुपसुंदर यांची नुकतीच मुंबई पोलीस दलात नुकतीच नियुक्ती झाली.
अमोल हे अतिशय गरीब आणि मध्यमवर्गीय परीवारातुन पुढे आलेले आहेत.त्यांच्या नियुक्तीमुळे तिगाव पंचक्रोशीतीत समाधान आणि आनंद व्यक्त होत आहे.
प्रसंगी अमोल तुपसुंदर यांचा छोटेखानी सत्कार आयोजित करण्यात आला होता.यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती नामदेव दादा.दिघे,तिगावचे माजी सरपंच विकास गायकवाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आत्माराम जगताप,सोपान दिघे आदींनी त्यांचा सत्कार करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या.
