श्रीरामपूर (दिपक कदम) एकात्मिक बालविकास सेवा योजना,श्रीरामपुर शिरसगाव गट अंतर्गत तालुक्यातील खंडाळा येथील सांस्कृतिक भवनात आरंभ धमाल बालक-पालक मेळावा उत्साहात पार पडला.
कार्यक्रमासाठी एकात्मिक बाल.विकास.सेवा.योजना प्रकल्प श्रीरामपूर प्रकल्प अधिकारी शोभा शिंदे,शिरसगाव क्षेत्र पर्यवेक्षिका कल्पना फासाटे, पर्यवेक्षिका आशा खेडकर,शांता गव्हाणे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा खंडाळ्याच्या सरपंच सौ.छाया बर्डे यांच्यासह उपसरपंच भारती वाघमारे,सदस्या मंजुषा ढोकचौळे,अनिता मोरे,सोनाली विघावे,लहानबाई रजपूत,श्री. ताराचंद अलगुंडे,संगिता ढोकचौळे,आरोग्य विभागाच्या डॉ. मोक्षदा पटेल,खंडाळा दत्तनगर, शिरसंगाव,दिघी,गोंडेगावच्या आशा सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.यावेळी विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते.
बालकाचे बाल अवस्थेतील वय ६ वर्षाचे असते हा काळ किती महत्त्वाचा असतो याची सर्व माहिती या स्टॉलद्वारे पालकांना देण्यात आली.प्रत्येक बालकाचा वाढत्या वयाप्रमाणे कशाप्रकारे विकास होतो याची देखील माहिती देण्यात आली.सर्व कार्यक्रमाची माहिती सौ.फासाटे यांनी उपस्थित पालकांना दिली. कार्यक्रमासाठी मंडपाची व्यवस्था खंडाळा ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आली होती.