प्रत्येक भागाचा विकास करणे हेच माझे कर्तव्य- आमदार सरोज आहिरे

Cityline Media
0
एन.टी.पी.एस.स्पोर्ट्स क्लबच्या वतीने भव्य सत्कार सोहळा

नाशिक (दिपक कदम)नाशिक औष्णिक विद्युत केंद्र, एकलहरे येथे एन.टी.पी.एस. स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने देवळाली मतदार संघाच्या  लोकप्रिय आमदार म्हणून दुसऱ्या पंचवार्षिक मध्येही प्रचंड मतांनी पुन्हा निवडून आलेल्या आमदार सरोज आहिरे  यांचा नुकताच एन.टी.पी.एस.स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर भव्य जाहिर सत्कार करण्यात आला होता.
एन.टी.पी.एस.स्पोर्ट्स क्लब यांच्या बरोबर एकलहारे ग्रामपंचायत,सामणगाव ग्रामपंचायत,माळसांगवी ग्रामपंचायत,विविध वीज कामगार संघटना,ग्रॅज्युएट इंजिनीयर असोसिएशन,सबऑर्डिनेट इंजिनियर असोसिएशन,वर्कर्स फेडरेशन,वीज निर्मिती संघटना, तांत्रिक युनियन,बहुजन पॉवर फ्रंट,केमिस्ट असोसिएशन, भारतीय मजदूर संघ,यांच्या वतीने आमदार सरोज आहिरे यांचा सन्मान करण्यात आला.

प्रसंगी राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेले एन.टी. पी. एस.स्पोर्ट्स क्लबचे खेळाडू यांचा सत्कारमूर्ती सरोज आहिरे यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.या कार्यक्रमासाठी वीज कर्मचारी, आजी-माजी खेळाडू आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रसंगी मनोगत व्यक्त करताना आमदार सरोज अहिरे यांनी सांगितले की,गेल्या पाच वर्षाप्रमाणे पुढील पाच वर्षाच्या कार्यकाळात देखील मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी तत्पर आणि बांधील राहणार असल्याचा विश्वास उपस्थितांना दिला.येथे खेळाडूंसाठी राबविण्यात येत असलेल्या चांगल्या सुविधाचा उल्लेख करून खेळाडूंना सर्वतोपरी मदत करणार असे सांगितले . 
 यावेळी  ना.औ. विद्युत केंद्रचे मुख्य अभियंता राजेश मोराळे,मा. नगरसेवक नासिक म.न.पा विशाल संगमनेरे,
उपमुख्य अभियंता, राजेश चव्हाण,अधीक्षक अभियंता, प्रविण गोसावी, संतोष कुलकर्णी,शिव छत्रपती पुरस्कार विजेते आनंद खरे, राष्ट्रीय पदक विजेते तथा राष्ट्रीय प्रशिक्षक बजरंग परदेशी,एकलहरा ग्रामपंचायत सरपंच अरुण दुशिंग,माध्यमिक विद्यामंदिर एकलहरेचे  प्राचार्य एम.के. वाघ,सामनगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सचिन जगताप, माळसांगवी ग्रामपंचायत उपसरपंच संदीप गोडसे, महाराष्ट्र माझा परिवार संस्थापक अध्यक्ष बंटी भागवत, शिंगवे ग्रामपंचायत माजी उपसरपंच धोंडिरम रायते,नाशिकरोड शिवजन्मोउत्सव समितीचे माजी अध्यक्ष विक्रम कोठुळे,नाशिकरोड भीम जयंती उत्सव समितीचे माजी अध्यक्ष संतोष कांबळे, नाशिकरोड शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष योगेश गाडेकर, नाशिकरोड शिवजन्मोउत्सव समिती माजी कार्याध्यक्ष मनोज ठाकरे आदी मान्यवर उपस्तिथ होते. 
या कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय व्हॅलीबॉल प्रशिक्षक मनोज म्हस्के,शशांक केसारखाने,सतीश सोनवणे, निवृत्ती जगताप,राहुल खर्जुल, सुशांत शिंदे,महेश लाड, बंडू जमधडे, गणेश कल्लूनगल, प्रज्वल पिंपळकर, साहिल जोगदंडे ,आयुष नागले,अविनाश डोळसे, आकाश सौदे, रोशन ढोकणे आदीनी परिश्रम घेतले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!