डि पॉल इंग्लिश मेडियम मध्ये मराठी भाषा दिन उत्साहात साजरा

Cityline Media
0
श्रीरामपूर (दिपक कदम) येथील डि.पॉल इंग्लिश मेडियम हायस्कूल मध्ये २७ फेब्रुवारीस मराठी भाषा अभिजात दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.इयत्ता पाचवी तुकडी ब.या वर्गातील मुलांनी मराठी भाषा दिन,परिपाठ सादर केला,मराठी साहित्यातील, विविध प्रकार नाटिकेद्वारे सादर करण्यात झाले.
रेव्ह.फादर फैन्को शाळेचे व्यवस्थापक यांनी मुलांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या त्यांनी आपले विचार मत मराठी भाषेत मध्ये व्यक्त केले.प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर सेलिन यांनी देखील मराठा भाषा दिनाच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुराधा कपिले यानी केले.स्नेहल नेवेवाणी यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा का? मिळाला या विषयी सर्वांना माहिती दिली तसेच सर्वांनी मराठी असल्याचा अभिमान बाळगावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले त्यानंतर मालन मोहन यांनी कुसुमाग्रज यांचे मराठी भाषेतील योगदान याविषयी माहिती सांगितली,सुनैना भालेराव ,स्वाती घोरपडे' माय मराठी' गीत सादर केले श्रुती हिंगे ( इयत्ता ३री )या विद्यार्थिनीने शिवगर्जना दिली कार्यक्रमाचे सर्व नियोजन अनुराधा कपिले,स्नेहल नेववाणी व मालन मोहन यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर सेलिन यांच्या मार्गदर्शना खाली केले गेले .
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!