शालेय विद्यार्थ्यांना लाडूचे वाटप करून आनंदोत्सव साजरा
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव) तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील कॅनरा बँक समोर चौकात शंभूराजे मित्र मंडळ व हिवरगाव पावसा ग्रामस्थांच्या वतीने कुळवाडी भूषण बहुजन उद्धारक छत्रपती शिवाजी महाराज जयंती ३९५वी जयंती साजरी उत्साह आणि चैतन्यात साजरी करण्यात आली.
ओप्रसंगी महंत एकनाथ महाराज पावसे व इतर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून आरती झाली.शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांतून छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आले.तसेच श्री.क्षेत्र देवगड देवस्थान इनाम जमिनीचा निकलाचा विजयोत्सव व जयंती निमीत्त देवगड देवस्थानच्या वतीने लाडूचे वाटप करून हा आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी सरपंच सुभाष गडाख भाजपा माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे,राजहंस दूध संघाचे संचालक डॉ.प्रमोद पावसे,देवगड देवस्थानचे अध्यक्ष गणपत पावसे,जेष्ठ संपादक यादवराव पावसे,देवगड अश्वप्रेमी संघटनेचे अध्यक्ष उत्तम जाधव,शिवसेनेचे जिल्हा पदाधिकारी सोमनाथ भालेराव,भाजपा तालुका उपाध्यक्ष गणेश दवंगे,सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक नारायण पावसे,कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे सचिव नितीनचंद्र भालेराव,जय मल्हार दूध संस्थेचे अध्यक्ष डॉ.संदीप पावसे,भीमाशंकर पावसे,नारायण पावसे,किरण पावसे,मोठाभाऊ बडे,केशव दवंगे व इतर मान्यवर उपस्थित होते.
येथील कॅनरा बँक चौकात बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे आयोजन शंभूराजे मित्र मंडळ,बजरंग दल व हिवरगाव पावसा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते.यावेळी जयंती समारंभाच्या प्रारंभी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.शालेय विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सुंदर रित्या सादर करुन शिवरायांना मानवंदना दिली.ग्रामस्थांनी त्यास भरभरून प्रतिसाद दिला महंत एकनाथ महाराज पावसे व मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेस पुष्पामाला अर्पण करून आरती झाली.त्यानंतर शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांना देवगड श्री क्षेत्र देवगड देवस्थान ट्रस्ट वतीने लाडूचे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व शंभूराजे मित्र मंडळाचे व बजरंग दलाचे अध्यक्ष बजरंग दल विनोद पावसे,यश बोऱ्हाडे,ओमकार
पावसे,विकास दारोळे,करण बोराडे,रोहित गडाख,सुमित पावसे,बच्चन भालेराव,रोहित भालेराव,बाळा गडकरी,
मच्छिंद्र गडाख,समाधान भालेराव,गोकुळ पावसे,
यांच्यासह हिवरगाव पावसा येथील सर्व संस्था पदाधिकारी व ग्रामस्थांनी सहकार्य केले.
