तेवीस वर्षानी एकत्र आलेले माजी विद्यार्थी भावुक
संगमनेर (प्नतिनिधी) तालुक्यातील चणेगाव येथील २००२-०३ या वर्षात दहावी उतीर्ण झालेल्या श्री.रामेश्वर विद्यालयाचा माजी विद्यार्थी मेळावा नुकताच उत्साहात पार पडला.तेवीस वर्षांनी एकत्र आलेल्या या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर यावेळी चैतन्य आणि समाधानाचे भाव प्रकटले.
आयर्लंड स्थित असलेले बापू जोशी तसेच भारतीय हवाई दलात सक्रीय असलेले प्रदिप पानसरे व विकास पर्वत, ज्योती पावडे, प्रकाश वाडगे यांनी या स्नेहसंमेलन मेळाव्याचे आयोजन केले होते.येथील रामेश्वर मंदिराच्या प्रांगणात हा मेळावा पार पडला.
कौलाघात धकाधकीच्या जीवनात सर्व जण आपापल्या परीने विखुरलेले पण ऋणानुबंध कधीच तुटत नसतात सर्वांनी एक दुसऱ्याला फोनाफोनी करून हा मेळावा नुकताच घडवून आणला.यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.प्रसंगी रामेश्वर भोसले यांच्या भाषणाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले ते म्हणाले की स्पर्धेच्या युगात प्रत्येकाने स्नेहबंध जपले पाहिजे माणुसकी निखळु देऊ नये.यावेळी उपस्थितांचा छोटेखानी सत्कार आयोजित करण्यात आला होता.
प्रसंगी रेखा ढमक,सुरेखा गुळवे,काजल शिंदे,ज्योती पावडे,पुष्पा मगर,अर्चना दातीर,रंजना दातीर,उज्वला वाडगे, गणेश बनग्यैया,रामेश्वर भोसले,दत्तू पर्वत, अविनाश कहार,बापू जोशी,प्रदिप पानसरे,प्रकाश वाडगे,रवि गुळवे सतिश बिरे, प्रदिप लोहाळे ,सुनिल खेमनर,मंगेश आहेर,केशव पवार,किशोर पावडे, सुनिल गुळवे आदी उपस्थित होते.सत्कार समारंभानंतर सर्वांनी एकत्रित स्नेहभोजन केले आणि या कार्यक्रमाची सांगता झाली.
