तुहा परवास पायला म्या...
अनादि संस्कृतीपासून ...
ए आय टेक्नोसॅव्ही युगापर्यंत ...
तवा ही तु....
कुटुंबं ...शेती ...घर ...
सांभाळून ...
मातृसंस्थेची बीजं रोवली ...
अन् कालांतरानं ..
त्या कळपाची ...टोळीची ...
त्या नदीकाठच्या गावाची ...
मातृदेवता झालीस ....
पुढे पुढे तर ...
तुझ्यासामोरं ...
नतमस्तक झाल्याशिवाय ...
वेस ओलांडून ...
जाणंही निषिद्ध मानलं ...
कारण तु जननी ...
कुटुंबाची ....विश्वाची ...
सृजन करणे तुहा नैसर्गिक गुण ...
जमीन ...माती ...माय ...पाणी ...
हवा ...अग्नी ...आकाश ...
सारं काही तुह्यात विलीन ...
त्या काळापासून ...
मध्ययुगिन काळात ....
तु झालीस रणरागिणी झांशीची ...
ग्वाल्हेरची अहिल्याबाई ...
अन् शाळा शिकवणारी सावित्रीमाई ...
आज त्यांच्यामुळेच तर तु जातेस ...
अवकाशाचा मागोवा घेण्यासाठी ...
अंतराळात...
कधी कल्पना तर कधी सुनीता बनून ...
कधी कधी घेतेस ...
देशाच्या प्रथम नागरिकत्वाची शपथ ...
प्रतिभाताई पाटील...
तर कधी ...
द्रौपदी मुर्मु म्हणून ...
कधी कधी ...
चित्रपटाच्या मोठ्या पडद्यावर ....
झळकतेस ...
ऑस्कर ....ग्रॅमी ...
मानांकनाच्या यादीत ...
कधी बेधुंद होऊन नाचतेस ...
तर कधी तंद्री लागून गातेस ...
कधी ऑलिम्पिकच्या स्पर्धेत उतरतेस ...
साक्षी मलिक ...
गीता ..बबिता ...विनेश फोगाट बनून ....
कधी नेमबाजीत राही सरनोबत ....
तर कधी एअर पिस्टल घेऊन मनू भाकर ...
कधी क्रिकेटची बॅट घेऊन हरमनप्रीत कौर ....
तर कधी स्मृती मंदाना ...मिताली राज ...
ही यादीसुद्धा अपुरी पडेल ...
परंतु तुझं सृजन नाही पडणार अपुरं ...
त्यामुळे अनादी तु अन् अनंत तुच ...
तुच आहेस सर्व काही ...
तुच सर्वव्यापी अन् सर्वार्थ...
तुझ्या गर्भातूनच निर्मिते इथली संस्कृती ...
तुझं असणं हेच इथल्या सृष्टीचं गाणं ....
तुझं असणं हेच इथल्या सृष्टीचं गाणं ...
आनंद दिवाकर चक्रनारायण
छाया : प्रमोद मूनघाटे
