जागतिक महिला दिनानिमित्त आद्य नृत्यांगना पवळा हिवरगावकर यांना अभिवादन

Cityline Media
0
हिवरगाव पावसा ग्रामपंचायत कार्यालयात महिला दिन साजरा 

संगमनेर (नितीनचंद्र भालेराव) १९ व्या शतकात तमाशा क्षेत्रामध्ये प्रथम पदार्पण करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील महिला नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर होय.त्या काळात पुरुष प्रधान संस्कृती व वर्ग व्यवस्थेचा पगडा होता.
सामाजिक विषमता मोठ्या प्रमाणात होती,आशा परिस्थितीत प्रवाहाच्या विरोधात जाऊन विषमतावादी व्यवस्थेला ठोकर मारून नामचंद पवळा यांनी तमाशा क्षेत्रात प्रथम पाऊल टाकले.त्यांनी पठ्ठे बापूराव यांच्या बरोबर महाराष्ट्रभर सर्वत्र वगनाट्य लावण्या सादर केल्या.महाराष्ट्राच्या लावणीला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात एक सोनेरी अध्याय लिहिला गेला.छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापूर येथील राजदरबारा मध्ये मिठाराणीचे वगनाट्य पवळा भालेराव व पठ्ठे बापूराव यांनी सादर केले आहे.महाराष्ट्र शासनाने सन २०२२ मध्ये राज्य सांस्कृतिक पुरस्काराला त्यांचे नाव देऊन सन्मान केला आहे.अशा कलेच्या महान सम्राज्ञी आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर यांना हिवरगाव पावसा येथे जागतिक महिला दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

ग्रामपंचायत हिवरगाव पावसा व कला सम्राज्ञी पवळा कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमास सरपंच सुभाष गडाख,उपसरपंच सुजाता दवंगे, ग्रामसेवक हरिष गडाख,भाजपा माजी तालुका अध्यक्ष काशिनाथ पावसे,कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे सचिव नितीनचंद्र भालेराव,भाजपा तालुका उपाध्यक्ष गणेश दवंगे,शिवसेना शिंदे जिल्हा पदाधिकारी सोमनाथ भालेराव,जेष्ठ संपादक यादवराव पावसे,मुख्याध्यापक सुरेश नगरे,जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक राजेश नवले, हरिभाऊ सहाणे,अंगणवाडी सेविका रंजना पावसे,सोनाली पावसे,दिपाली वाकचौरे,आशा सेविका स्वाती पावसे,अलका पावसे,शीला पावसे,योगिता पवार,हेमलता भालेराव, ग्रामपंचायत कर्मचारी प्रवीण गडाख,सचिन अरगडे, बाळासाहेब भालेराव यांच्या सह हिवरगाव पावसा येथील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!