भारताचा प्राचीन इतिहास पहायला गेले तर भारत हा कधीही पुरुषसत्ताक देश नव्हता या भारतात शेतीचा शोधही निऋती या स्त्री ने लावला आहे
निऋती ही तिच आहे जिचा संबंध अनार्य आणि अवैदिक संस्कृतीशी होतो इथल्या मातीशी होतो.आजही निऋती नावाने एक दिशा आहे आणि आपल्या लोकांसाठी ती शुभ दिशा आहे.
निऋती नंतर सिंधू संस्कृतीच्या खोऱ्यात सुद्धा स्त्रीसत्ताक संस्कृती होती गणव्यवस्थेत स्त्री या मुख्य असायच्या ज्या प्रमाणे सध्याच्या परिस्थितीत सरपंच असतो त्या प्रमाणे स्त्रिया सुद्धा गणप्रमुख होत्या, गणप्रमुख म्हणजे गणपती निऋती नंतर अशा कित्येक अनार्य स्त्री या गणप्रमुख होउन गेलेल्या आहेत शेतीचा व्यवसाय ,महसूल ,राज्य ,प्रशासन ,औषधे याबाबत त्या लक्ष द्यायच्या जशाअंबाबाई रेणुका सटवाई निनाई भवानी या सर्व अनार्य गणमाता होत्या ज्या राज्यकारभार करत होत्या.
नंतर गौतम बुद्धांच्या संघात सुद्धा भिक्षुणी म्हणून स्त्रिया होत्या सर्वात प्रथम भिक्षुणी ही गौतम बुद्ध यांची आई मावशी गौतमी प्रजापती होती पुढे जाऊन तिने आणि गौतम बुद्ध यांच्या पत्नी यशोधरा यांनी खूप मोठा आशिया खंडातील भिख्खूनी संघ स्थापन केला कित्येक दुखी कष्टी स्त्रियांना त्यांनी संघात घेतले.
सम्राट अशोक यांच्या काळात स्त्रिया खांद्याला खांदा लावून राज्यकारभार करत होत्या.इ.स. दोनशे शतकाच्या आधी गेलात तर महाराष्ट्रात असलेल्या कित्येक लेण्यांच्या आवारात खडकावर जी बौद्ध शिल्प आहेत त्यात कित्येक स्त्रिया हत्ती,घोडे आणि सिंहासनावर बसलेल्या आहेत सम्राट अशोक यांच्या काळात भारताला सोने की चिडीया म्हटलं जायचं भारताचा जीडीपी आजच्या जीडीपी पेक्षा सत्तर टक्के जास्त होता पुरुष स्त्रिया मध्ये कसलाही भेद नव्हता.. सम्राट अशोक यांच्या काळातील कैक शिल्प पहा
कार्ला,कान्हेरी बोरिवली,भाज्या लेणी,अजिंठा या प्रत्येक लेण्यात स्त्रिया राज्यकारभार करत होत्या याचे पुरावे आहेत.
गौतम बुद्ध यांनी आनंद आणि प्रसेनजीत राजा या आपल्या भावाला उपदेश केला होता मुलगी जन्माला आली म्हणून काय झाले स्त्रिया या उत्तम राज्यकारभार करु शकतात एक क्षत्रिय राजा जन्माला घालू शकतात .
स्त्रिया या शिलवान असतात ,त्या संयमी असतात ,प्रज्ञावंत असतात पुरुष तसा नसतो पुरुषाकडून शिलाचे पालन होत नाही पुरुषाला संयम नसतो पुरुषाकडून झालेले निर्णय विचार करून नसतात घाईघाईने, गडबडीत केलेले निर्णय असतात.
वरील गोष्टींचा विचार करून भारतातील सत्ता सर्वच राहुदे ३:१ झाली तर खूप मोठा भारत देश महासत्ता बनेल ,प्रत्येक ठिकाणी १०० मध्ये ७० स्त्रिया आणि ३० पुरुष असा जर आकडा असेल तर पुरुषांना आपले विचार कोणावरही लादता येणार नाहीत .
त्याठिकाणी नियम नसून तत्वावर संपूर्ण सिस्टीम चालेल
कायदे कडक होतील शिवाय देशात विषमता राहणार नाही दलाली नष्ट होईल,भटशाही नष्ट होईल समता प्रस्थापित होईल पण ज्यानंतर मनुस्मृतीची प्रतीक्रांती झाली तेव्हा ब्राह्मण धर्माने या स्त्रियांना खूप कठोर कायदे लावले स्त्रियांना भरपूर अमानुष वागवले .
चुल आणि मुल यासाठी फक्त स्त्री चा विचार होऊ लागला यौनाचार वाढला अत्याचार वाढला
स्त्रीचे भरपूर शोषण झाले नंतर ही आपल्या महापुरुषांनी या गुलामीतून स्त्रियांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल आणले आणि स्त्रियांना सर्व हक्क अधिकार मिळवून दिले.
जर देशात समता ,बंधुभाव आणि एकता टिकवायची असेल तर स्त्री,अस्पृश्य ,आदिवासी, किन्नर, दलित प्रतिनिधित्वासाठी आपण पुढाकार घ्यायला हवा...
शिक्षण ,पुस्तके ,विज्ञान आणि टेक्नॉलॉजी मध्ये यांना प्राधान्य द्यायला हवे पण जिथं कायद्याचे उल्लंघन होते तिथे कडक कायदेशीर कारवाई करण्यात यायला हवी.
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे भारतातील स्त्री राष्ट्रपती झाली,राज्यपाल झाली,प्रधानमंत्री झाली सरपंच झाली,आय ए एस झाली,आय पी एस झाली ,वैमानिक झाली,मेट्रो ,लोको पायलट झाली,स्वतः नोकरी करून स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तींचा सांभाळ करू लागली.कर्तुत्ववान झाली आहे . शिक्षीत झाली आहे.
हे सर्व संविधानामुळे शक्य झाले आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आपर मेहनतीमुळे मुळे झाले आहे
वरील गोष्टींचा विचार केल्यास आपल्या देशात स्त्री,अस्पृश्य ,आदिवासी ,दलित आणि अल्पसंख्याक यांच्या प्रतिनिधित्वासाठी पुढाकार घेतल्यास आणि यांच्यावर सरकारने लक्ष दिल्यास भारताला महासत्ता बनण्यासाठी कोणी रोखू शकणार नाही.
मी तर शंभर टक्के समर्थन करत आहे
भारत हा पुन्हा स्त्री सत्ताक देश व्हावा आणि संविधानाच्या आधारावरच व्हावा आणि होऊ शकेल
म्हणजे विषमता ,जातीयवाद ,लिंगभेद ,
भेदभाव ,असामनता याचा स्पर्श ही होणार नाही
मो+91 70578 01271
