कालकथित दिनकर साळवे स्मृती पुरस्काराचे समारंभपुर्वक वितरण
संगमनेर (प्नतिनिधी) ज्या समाजातून आपण पुढे आलो.प्राध्यापक -शिक्षक झालो अथवा अन्य क्षेत्रात नोकरी मिळवून स्थिरावलो,त्या समाजाच्या उत्थानासाठी,त्या समाजाच्या प्रश्नांच्या लढ्यासाठी आपलं योगदान,सहभाग देणे आवश्यक आहे.पण अपवाद वगळता बहुसंख्य मध्यमवर्गीय अलिप्तता ठेवत उच्चवर्णीय असल्यासारखे जगतात.असे निरिक्षण सामाजिक कार्यकर्ते व लेखक हेरंब कुलकर्णी यांनी संगमनेर येथे पुरस्कार स्वीकारताना नोंदवले.
सुजात फौंडेशन संगमनेरच्या वतीने दर वर्षी दिला जाणारा कवी दिनकर साळवे स्मृती पुरस्कार या वर्षी हेरंब कुलकर्णी यांना देण्यात आला.शाल मानपत्र सन्मानचिन्ह आणि रुपये ५,००० रोख रक्कम देऊन त्यांना समारंभपुर्वक सन्मानित करण्यात आले. पुरस्काराला उत्तर देताना त्यांनी आपले मत मांडले.हा पुरस्कार ख्यातनाम कवी,लेखक,मा.आमदार लहू कानडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.विचार मंचावर नाटककार डॉ.सोमनाथ मुटकुळे, सामाजिक कार्यकर्ते व लेखक हिरालाल पगडाल,सुजात फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष के.जी.भालेराव उपस्थित होते.
प्रा.डाॅ.मिलींद कसबे यांनी कवी दिनकर साळवे यांच्या स्मृतीला उजाळा देत,दिनकर साळवे यांनी आपल्या कवितांतून,लेखनातून, भाषणांतून सामाजिक जागल्याची भूमिका पार पाडली.म्हणून त्यांच्या स्मृती जतन करण्याचे काम,त्यांचे नावे पुरस्कार देऊन हे फाऊंडेशन करते,हे कौतुकास्पद आहे.
प्रमुख पाहुणे लहू कानडे यांनी म्हणाले,देशाची सर्व व्यवस्था पोखरली गेली आहे.गुंडगिरी आणि दादागिरीच्या जोरावर आर्थिक सुबत्तेच्या जोरावर प्रस्थापित लोकप्रतिनिधी सर्व व्यवस्थातांचा ताबा आपल्या हाती ठेवत आहे.सर्वसामान्यांचा आवाज दाबला जात आहे.
सर्वसामान्यांतून उभं राहू पहात असलेले नेतृत्व खुंटवून टाकले जात आहे.या कार्यक्रमात फुले -शाहू-आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते कालकथित प्रा.जी.बी.कदम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
मुंबई पोलिस भरतीसाठी निवड झालेले रवींद्र येवले व नारी सन्मान पुरस्काराने सन्मानित झालेल्या बेबी सांगळे यांचा सत्कारही लहू कानडे यांच्या हस्ते झाला.प्रा.जयसिंग सहाणे, जिजाबा हासे,के.सी.बागूल, विश्वनाथ आल्हाट,रिपाई नेते ॲड.किरण रोहम,अशोक रुपवते, रवींद्र दिवे, निलेश कुसरे, सचिन साळवे, विनोद गायकवाड ,पोपटराव सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक के.जी.भालेराव यांनी केले.सूत्रसंचलन लेखक संदीप वाकचौरे यांनी केले.व आभार नाट्यकर्मी सूर्यकांत शिंदे यांनी मानले.
