आभार प्रदर्शन
प्राध्यापक ना. सी.फडके यांनी स्वागत,प्रास्ताविक करणारे, अध्यक्ष आणि आभार मानणारे यांना व्यासपीठाचे शत्रू म्हटले आहे.
आपण या शत्रू ना मित्र बनवू या.वक्ते जन्माला येत नाहीत.वक्ते घडावे, घडवावे लागतात ही भूमिका मध्यवर्ती हवी.आभार हा समारंभ, सभा समाप्त करण्याचा औपचारिक भाग आहे.
श्रोते कंटाळलेले असतात. बरेच जण भाषण आवडलं म्हणून नव्हे तर संपलं याचा आनंद व्यक्त करण्यासाठी टाळ्या वाजवतात. मंडप आणि सतरंजी वाल्या सहित हजर असणाऱ्या सर्वांचा उल्लेख करण्याची गरज नाही.आभार हा औपचारिक समारोप पाच मिनिटात संपला पाहिजे.
काकासाहेब गाडगीळ यांच्या मते आभार प्रदर्शनाचे निमित्त करून श्रोत्यांवर लांबलचक भाषण लादू नये. अगोदर सर्वांची भाषणे सर्वांनी ऐकलेली असतात त्यामुळे सर्वांच्या भाषणाचा आढावा आणि सारांश सादर करणे हा श्रोत्यांवर अन्याय आहे. आभाराचे रुपांतर छळ छावणीत होऊ नये. आभाराचे भाषण आटोपशीर, चटकदार आणि कमी शब्दात सुंदर समारोप करणारे ठरावे. म्हणजे आभार मानणारा हा तिसरा व्यासपीठ शत्रू व्यासपीठ मित्र होईल.
संजय थोरात
