रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते पप्पू कागदे यांची महामानव फौंडेशनला सदिच्छा भेट.

Cityline Media
0
शिर्डी (प्रतिनिधी) लोकहितार्थ सामाजिक चळवळ म्हणून सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर शिर्डी येथील महामानव फौंडेशन आपल्या सामाजिक कामामुळे आणि जाणिवेमुळे अल्पावधीतच लोकप्रिय ‌झाले कारण समाजहित साध्य करणारे महामानव फौंडेशनचे स्वंयसेवक नेहमी लोकांच्या अडी अडचणीसाठी धावून येतात त्याच कामाची पोचपावती म्हणून या संस्थेला राज्यभरातील इतर राज्यातील आणि देशातील वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेल्या लोक भेट सामाजिक राजकीय आर्थिक किंवा तत्सम वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक मिळविलेले लोक शिर्डीत आले की महामानव फौंडेशनला भेट देतातच
नुकतेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष,संघर्षवीर पप्पू कागदे महामानव फौंडेशन महाराष्ट्र राज्याच्या जनसंपर्क कार्यालयास भेट दिली प्रसंगी त्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला.आंबेडकर चळवळीतील भविष्यातील आव्हाने व चळवळीतील विविध विषयांवर त्यांनी मनसोक्त चर्चा केली यावेळी त्यांचा सत्कार महामानव फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संघर्ष योद्धा शिमोन जगताप यांनी केला यावेळी चळवळीतील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.महामानव फौंडेशनचे काम अहिल्यानगर जिल्ह्यात वागण्या जोगे आहे या संस्थेचे भविष्य उज्वल आहे असे ‌सुतोवाच यावेळी श्री.कागदे यांनी केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!