महाबोधी आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी श्रीरामपूरात ७ मार्चला निदर्शने

Cityline Media
0
१९४९ चा ब्रिटिश कायदा रद्द करुन विहार संविधानाच्या चौकटीत आणावे.

श्रीरामपूर (दिपक कदम) बिहार येथील बुद्धगयातील भिक्खू संघाने पुकारलेल्या महाबोधी मुक्ती आंदोलनला पाठिंबा देण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्याच्या लुंबिनी बुद्ध विहार येथे रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच सर्व पक्षीय बैठक पार पडली.
रिपाई भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी बसपा पिपल्स रिपब्लिकन पार्टी दलित चळवळीतील सर्व पक्ष संघटना  यांची सर्वपक्षीय बैठक झाली यावेळी बैठकीत सर्वानुमते असे ठरले की शुक्रवार दिनांक ७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता बुद्धगयेतील महाबोधी मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्षीयाच्या वतीने प्रांतकार्यालयावर  भव्य निदर्शने करणार असल्याची माहिती रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी दिली.

प्रसिद्धी दिलेल्या  पत्रकात त्यांनी म्हटले आहे,की बिहार येथील बुद्धगया येथील प्राचीन महाबोधी महाविहार हे जगभरातील बौद्धांचे सर्वोच्च पवित्र स्थान आहे,बौद्धांचे श्रद्धास्थान बौद्धाच्या ताब्यात असले पाहिजे महाबोधी विहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देणे नैसर्गिक न्याय ठरेल कारण हिंदू मंदिरे हिंदूंच्या ताब्यात मुस्लिमांची मज्जिद मुस्लिमांच्या ताब्यात ख्रिश्चनांचे चर्च ख्रिश्चनांच्या ताब्यात मग बौद्धांचे महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात का?नाही असा सवाल उपस्थित करत ते पुढे म्हणाले की ब्रिटिश काळातील १९४९चा महाबोधी महाविहारला लागू असलेला कायदा रद्द करून हे विहार संविधानाच्या चौकटीत आणावे.

भारतीय संविधानानुसार कायदा करून त्या कायद्याद्वारे ट्रस्ट स्थापन करून  महाबोधी महाविहार  सर्व ट्रस्टी बौद्ध असले पाहिजे असा कायदा करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या या मागणीसाठी आम्ही श्रीरामपूर येथील सर्व पक्षीय आंबेडकरी अनुयायांनी ७ मार्च रोजी सकाळी ११:०० वाजता  प्रांतकार्यालयावर सर्वपक्षीय भव्य निदर्शने केली आहे तरी फुले शाहू आंबेडकर चळवळीत सर्व पक्ष संघटनेच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे.

यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे सुगंधरा इंगळे प्रकाश सावंत राष्ट्रवादीचे अशोक बागुल रिपाईचे सुनील शिरसाठ सुरेश जगताप राजू नाना गायकवाड मोहन आव्हाड मनोज काळे विशाल सुरडकर रॉकी लोंढे वंचितचे चरण त्रिभुवन सुनील वाघमारे बसपाचे सुनील मगर मच्छिंद्र ढोकणे पिपल्स पार्टीचे संतोष मोकळ स्वराज्य संघटनेचे विजय खाजेकर गोरख आढाव भीम पॅंथरचेअमित काळे तंटामुक्तीचे अध्यक्ष रवीअण्णा गायकवाड बौद्धाचार्य अण्णासाहेब झिने रमेश व्हसाळे उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!