श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघ प्रमूख पदी चंद्रकांत कराळे तर श्रीरामपूर युवक तालुका प्रमुख पदी रघुनाथ शिंदे.
अहिल्यानगर (प्नतिनिधी) प्रहार जनशक्ती पक्षाच्या अहिल्यानगर उत्तर जिल्हा उप प्रमुख पदी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस यांची नुकतीच निवड करण्यात आली असून,प्रहारचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर सांगळे व युवक जिल्हाप्रमुख विधीतज्ञ पांडुरंग औताडे यांनी निवडीचे पत्र देऊन ढूस यांचे अभिनंदन केले.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील प्रहार जनशक्ती पक्षाची नूतन कार्यकारणी पदाधिकारी निवडण्यासाठी देवळाली प्रवरा येथे आज प्रहारच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
प्रसंगी प्रहारचे उत्तर जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर सांगळे, युवक जिल्हाप्रमुख पांडुरंग अवताडे, बाळासाहेब खर्जुले, चंद्रकांत कराळे, रघुनाथ शिंदे, प्रकाश वाकळे, शरद खांदे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रसंगी प्रहारचे अहिल्यानगर उत्तर जिल्हा उपप्रमुख पदी देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस तर जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून नेवासा तालुक्यातील बाळासाहेब खर्जुले यांची निवड करण्यात आली.
त्याचबरोबर श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष पदी राहुरी फॅक्टरी येथील चंद्रकांत कराळे, तर श्रीरामपूर युवक तालुका अध्यक्ष पदी टाकळीभान येथील रघुनाथ शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
निवड झालेल्या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर सांगळे व युवक जिल्हाप्रमुख विधीज्ञ पांडुरंग अवताडे यांनी शाल श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन अभिनंदन केले व पक्ष वाढीसाठी शुभेच्छा दिल्या.
