गणोरे (प्रतिनिधी)दलित,शोषित, पीडितांच्या हक्कासाठी आयुष्यभर लढा देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे त्यांच्या कुटुंबीयांचा त्याग खूप मोठा आहे,अशा कार्यकर्त्यांच्या पत्नींचा सन्मान होणे गरजेचे असल्याचे मत संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी व्यक्त केले.
नुकतेच अकोले तालुक्यातील गणोरे येथे कालकथित मीराबाई घोसाळे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आदर्श माता गौरव पुरस्काराने संगमनेर-अकोले तालुक्यातील महिलांचा सन्मान करण्यात आला प्रसंगी डॉ.मंगल हांडे, डॉ.रवींद्र घोसाळे आदी यावेळी उपस्थित होते.पुष्पा सुधाकर रोहम,लता माणिकराव यादव,अंजना विष्णू वाघमारे,सुशीला दादासाहेब रूपवते, कुसुम सर्जेराव माघाडे, मंदा सुरेश देठे, मीना चंद्रकांत सरोदे,छबू दादासाहेब गायकवाड, सोना कचरू पवार, हौसा लालू रूपवते,शैला रघुनाथ भालेराव रंजना रमेश जगताप, जना दगडू सोनवणे, हिरा रावसाहेब भालेराव,कौशा दामोदर दातीर,परिघा संपत गडाख, यमुना मारुती दातीर, गीता निवृत्ती आंबरे, मीरा रमेश शिरकांडे, मुक्ता अगस्ती बनसोडे यांचा दुर्गा तांबे व डॉ.मंगल हांडे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह,शाल देऊन सत्कार करण्यात आला.सौ.दुर्गा तांबे पुढे म्हणाल्या,की प्रतिकूल परिस्थितीत या कार्यकर्त्यांच्या पत्नींनी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळली, घोसाळे परिवाराने आपल्या आईच्या स्मरणार्थ संगमनेर-अकोले तालुक्यातील आदर्श मातांचा केलेला गौरव कौतुकास्पद असल्याचे त्या म्हणाल्या.यावेळी अनुराधा आहेर,अँड हांडे व इतरांची भाषणे झाली.