लोणीत भरणार म्हशींचा बाजार

Cityline Media
0
पहिला सौदा दोन  लाख सत्तर हजारांचा 
लोणी,(प्रतिनिधी) दुधाळ संकरित गायींच्या खरेदी-विक्रीचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आठवडे बाजार  म्हणून लोणी येथील बाजार प्रसिद्ध आहे.येथील शेळ्यांचा बाजार देखील तितकाच प्रसिध्द आहे. 
बुधवारी भरणाऱ्या या बाजारात आता म्हशींचा बाजार आणि खरेदी विक्री होणार असल्याचे वृत्त आहे नुकताच येथे पहिल्या सौद्यातील म्हशीला तब्बल २ लाख ७० हजार रुपयांची किंमत मिळाली असल्याचे कळते.
या बाजाराचा प्रारंभ माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पा.यांच्या हस्ते झाला.माजी सभापती बापूसाहेब आहेर होते.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, उपसभापती अण्णासाहेब कडू, नंदकिशोर राठी,किसनराव विखे, संपतराव विखे पा., उपस्थित असताना यावेळी संतोष संपत गदाई व सुरेश ओंकार गदाई यांच्या मालकीची म्हैस विक्रीसाठी आली होती होती.या म्हशींच्या सौद्यानंतर बाजारास प्रारंभ झाला 

म्हशींच्या पहिल्याच बाजारात म्हशीचा सौदा २ लाख ७० हजार रुपयांना झाला.प्रसंगी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, उपसभापती अण्णासाहेब कडू व सचिव सुभाष मेटे अशोक धावणे, सुभाष गमे, बंडू लगड, लक्ष्मण बनसोडे, बाजार समितीचे सचिव सुभाष मोटे यांच्यासह बाजार समितीचे संचालक उपस्थित होते.
प्रवरा चाळीस क्रोशीतील पशु पालकांनी आपल्या म्हशी विक्रीसाठी आणल्या.व्यापारी व दलालांनी त्यांची खरेदी केली.अण्णासाहेब म्हस्के पा.म्हणाले, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पा.यांच्या मार्गदर्शनाखाली ही बाजार समिती कार्यरत आहे. येथे शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन कारभार केला जातो.म्हशींचा बाजार सुरू झाल्याने जनावरांच्या बाजारांच्या वैभवात भर पडणार आहे.प्रसंगी ज्ञानेश्वर चौधरी यांनी बाजार समितीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन भोमराज निर्मळ यांनी केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!