लोकसेवा हिच ईश्वरसेवा समजुन ‌अविरत सेवा करणाऱ्या महिलांचा श्रीरामपुरात सन्मान

Cityline Media
0
श्रीरामपूर ( दिपक कदम) येथील दत्त कुसुम प्रतिष्ठान अंतर्गत एकता मंच आणि जिजाऊ ब्रिगेड श्रीरामपूर तालुका यांचे तर्फे नुकतेच येथील विविध धार्मिक क्षेत्रात अविरत सेवा करणाऱ्या काही महिलांचा सन्मान त्यांच्या कार्यस्थळावर जाऊन करण्यात आला.
त्यात विशेष करून सेंट लुक हॉस्पिटल येथील सिस्टर रिटा व सिस्टर जॅकलीन,महानुभाव पंथीय तपस्विनी नंदाबाई खामणीकर,बुद्ध विहार येथील वैशाली अहिरे,गुरु द्वार येथील रीना आर्नेचा,नीतू गुलाटी,प्रीत गुरुवाडा,आणि निरंकारी भवन येथील संकपाळ ताई यांचा सन्मान सोहळा करण्यात आला.

त्यावेळी मंचच्या व जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष जयश्री काचोळे जगताप,जिजाऊ ब्रिगेड उपाध्यक्ष पौर्णिमा पिसे व जिजाऊ ब्रिगेड कार्यकारिणी सदस्य सुनिता दाभाडे,लता गुडदे,मनीषा शिंदे, कीर्ती  नाझीरे, आणि समाजातील मान्यवर महिला हेमा गुलाटी,मधु लुल्ला,प्रिया शहा,रीना बिकचंदानी, किरण रोयरा आणि समाजातील इतर महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. राजकुमार माटा यांनी सर्व महिलांचे खूप कौतुक केले व आभारही मानले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!