कालकथित दिनकर साळवे स्मृती पुरस्कार हेरंब कुलकर्णी यांना जाहीर
संगमनेर -येथील सुजात फाउंडेशन संगमनेरच्या वतीने दिला जाणारा कालकथित जेष्ठ कवी,विचारवंत दिनकर साळवे स्मृती पुरस्कार यावर्षी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, लेखक हेरंब कुलकर्णी यांना जाहीर झाल्याची माहिती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष के.जी.भालेराव यांनी दिली.
यापूर्वी हा पुरस्कार लेखक, सामाजिक कार्यकर्ते किसन चव्हाण(शेवगाव),सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत प्रा.गंगाधर अहिरे (नाशिक),जेष्ठ नाटककार डॉ.सोमनाथ मुटकुळे (संगमनेर) यांना देण्यात आला आहे.
हा पुरस्कार लेखक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता अशा निकषाने दिला जातो.
हेरंब कुलकर्णी यांचे सामाजिक क्षेत्रातील काम,केलेले लेखन आणि ते महाराष्ट्रभर देत असलेले व्याख्याने याची दखल महाराष्ट्र पातळीवर घेतली गेलेली आहे.म्हणून त्यांची या पुरस्कारासाठी निवड,निवड समितीचे प्रा.डाॅ.मिलींद कसबे,प्रा.डाॅ.राहूल हांडे,प्रा.गंगाधर अहिरे यांनी केली.
हा पुरस्कार रविवार दि.९ मार्च २०२५ रोजी सायं.६.३०वा.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील व्यापारी असोसिएशन हाॅल या ठिकाणी जेष्ठ कवी, लेखक, माजी आमदार लहू कानडे यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे माजी आमदार डॉ.सुधीर तांबे असणार आहेत.अशी माहिती संयोजन समितीचे सूर्यकांत शिंदे,लेखक संदीप वाकचौरे,जिजाबा हासे, सुखदेव मोहिते, सुखदेव इल्हे, राजीव साळवे,अरविंद सांगळे,अशोक रुपवते,मेजर सुभाष ब्राम्हणे, सचिन साळवे,बंटी यादव, विनोद गायकवाड रवींद्र दिवे, निलेश कुसरे,दीपक वाघमारे आदींनी दिली.
