श्रीरामपूर (दिपक कदम) स्त्री सत्ताक संस्कृतीचा गौरव म्हणून येथील बेलापूर रेल्वे स्थानकात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजक बेलापूर रेल्वे स्थानकाचे प्रबंधक एम. पी. पांडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन होते. त्यांनी बेलापूर रेल्वे स्थानकात विविध पदावर कार्यरत असणाऱ्या महिला ऑफिस सुपरडेंट श्रीमती रेखा मुगळीकर सी.सी. टि.सी,श्रीमती बी.डी. सिंग बुकिंग सुपरवायझर ,श्रीमती सुनिता तारे रिझर्वेशन सुपरवायझर,कु. शितल मोकळ आदी महिलांचा रेल्वे स्थानक प्रबंधक एम.पी पांडे रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन लष्करी सेवा निरिक्षक विद्यांशु सिंग ,मुख्य वाणिज्य निरीक्षक.अशोक कुमार यादव आणि गोरख आढाव यांच्या हस्ते त्यांचा व बेलापूर रेल्वे स्थानकात कार्यरत असणाऱ्या सर्व महिलांचा पुष्पगुच्छ शाल देऊन सत्कार करण्यात आला.
त्यावेळी सुभाष त्रिभुवन म्हणाले की जगाच्या पाठीवर महिला आता कुठेच कमी राहिलेली नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये तिने आपले नाव कोरले आहे.तसेच यशस्वी पुरुषा पाठीमागे महिलांचा हात असतो हे जग जाहीर आहे म्हणून महिलांचा सन्मान हा ८ मार्च पुरता मर्यादित न राहता प्रत्येक दिवशी प्रत्येक महिलांचा मान सन्मान करून आदराची वागणूक दिली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने रोज महिला दिन साजरा केल्याचे सार्थक होईल असे त्रिभुवन म्हणाले.
रेल्वेने ८ मार्च औचित्य साधून श्रीमती रेखा मुगळीकर यांना सेवेत बढती देऊन टीसी केले यावेळी सत्काराला उत्तर देताना श्रीमती मुगळीकर म्हणाल्या की ८ मार्च माझा वाढदिवस असून आज जागतिक महिला दिन आहे याच दिवशी सेंट्रल रेल्वेने मला प्रमोशन गिफ्ट देऊन टीसी केले. सेंट्रल रेल्वेची मी आभारी आहे तसेच प्रत्येक पुरुषाने प्रत्येक महिलांना रोज आत्मसन्मानाने वागणूक दिली पाहिजे हिच अपेक्षा प्रत्येक स्त्रियांची असते यावेळी रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.
