अनाथ आश्रमातील मुलींमध्ये जागतिक महिला दिनाचा उत्सव.

Cityline Media
0
प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन

श्रीरामपूर (दिपक कदम): समाजातील वंचित आणि अनाथ मुलींमध्ये आत्मविश्वास जागृत करण्याच्या उद्देशाने तालुक्यातील श्री.साई-विठ्ठल अनाथ आश्रम,गोखलेवाडी येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.मोरया फाउंडेशनच्या सौजन्याने आयोजित या विशेष उपक्रमात मा.नगरसेविका सौ. स्नेहल केतन खोरे यांनी उपस्थित राहून मुलींना प्रेरणादायी मार्गदर्शन केले आणि त्यांच्यासोबत हा आनंददायक दिवस साजरा केला.
या कार्यक्रमात मुलींसाठी विविध खेळ,प्रेरणादायी संवाद आणि मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे, स्नेहल खोरे यांनी मुलींशी मनमोकळा संवाद साधत शिक्षण, आत्मनिर्भरता आणि महिला सशक्तीकरण या विषयांवर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, "महिला दिन हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित राहू नये,तर महिलांना दररोज प्रेरणा आणि संधी मिळाली पाहिजे.समाजाने महिलांच्या प्रगतीसाठी हातभार लावला,तर आपण खऱ्या अर्थाने समतोल आणि सक्षम समाज निर्माण करू शकतो."

या कार्यक्रमाला नूतन माळवे, मनीषा बर्डे,तृप्ती भगत,वर्षा भोईर आणि कृष्णानंद महाराज आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी मुलींना विविध प्रेरणादायी कथा सांगून त्यांना आयुष्यात मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि त्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला.कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले,जिथे मुलींनी आनंदाने सहभाग घेतला.त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य खुलले आणि त्यांनी या खास दिवसाच्या आठवणी कायम ठेवण्याचा संकल्प केला.

महिला दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे अनाथ आश्रमातील मुलींना आनंद मिळण्यासोबतच त्यांच्यात आत्मविश्वास आणि पुढे जाण्याची जिद्द निर्माण झाली. अशा उपक्रमांमधून समाजाने पुढे येऊन महिलांच्या शिक्षण, सशक्तीकरण आणि हक्कांसाठी कार्य करणे आवश्यक असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.अशा उपक्रमांमुळे समाजातील उपेक्षित घटकांना नवीन दिशा मिळते आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास मदत होते.पुढील काळातही या प्रकारचे कार्यक्रम सातत्याने आयोजित करून मुलींच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!