देवळाली प्रवरा (प्नतिनिधी) समाज हितासाठी लोकहित प्रर्वतक बनलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस यांची व श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघ क्षेत्र प्रमुख पदी चंद्रकांत कराळे यांची तसेच देवळाली प्रवरा शहर प्रमुख पदी प्रकाश वाकळे आणि शिवाजीनगर शहर प्रमुख पदी शरद खांदे यांची निवड झाल्याबद्दल शिवाजीनगर येथील साई सेवा पतसंस्थेचे वतीने त्यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार आणि अभिनंदन करण्यात आले.
प्रसंगी साईसेवा पतसंस्थेचे अध्यक्ष प्रदीप येवले, उपाध्यक्ष विलास मुसमाडे, छत्रपती रावसाहेब मुसमाडे,प्रहारचे माजी शहर उप अध्यक्ष गणेश भालके, राहुरी कारखान्याचे श्री.बंगाळ आदी मान्यवरांनी उपस्थित राहून नुतन पदाधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी नुतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.