बार्टीचे पाच विद्यार्थी झळकले

Cityline Media
0
बार्टीचे पाच विद्यार्थी बनले असिस्टंट कमांडंट

रोशन कड्डू, व्यंकट गायकवाड, अजित खरात, मयूर रंगारी व अजय इट्खरे यांचा समावेश

सिटीलाईन न्यूज नेटवर्क

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीतर्फे नागरी सेवा पूर्व तथा मुख्य परीक्षेचे (यूपीएससी) पूर्वतयारी प्रशिक्षण दिले जाते.या प्रशिक्षणातील पाच विद्यार्थ्यांची केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील असिस्टंट कमांडंट पदी निवड करण्यात आली आहे.
येत्या मे अखेरपर्यंत त्यांचे हैदराबाद येथे प्रशिक्षण सुरू होणार आहे.या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये व्यंकट प्रकाश गायकवाड,अजित सूर्यकांत खरात, मयूर दीपक रंगारी, रोशन अरविंद कडू, अजय इट्खरे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
यूपीएससीद्वारे केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील असिस्टंट कमांडंट या पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. बार्टीमार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी यूपीएससी नागरी सेवा पूर्व तथा मुख्य परीक्षेचे पूर्वतयारी प्रशिक्षण दिले जाते.प्रशिक्षण योजनेत विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाते.निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मासिक विद्यावेतन,मोफत प्रशिक्षण,प्रवास भत्ता दिल्या जातो.
माझे आईवडील शेतमजूर. घरी तीन भावंडे. घरची परिस्थिती बेताचीच. यूपीएससी योजनेबाबत कळले. अभ्यास सुरू केला. पण आर्थिक परिस्थितीमुळे पूर्णवेळ अभ्यास करू शकत नव्हतो. मित्राकडून बार्टीबाबत माहिती मिळाली. यूपीएससी योजनेत निवड झाली. प्रशिक्षणादरम्यान मिळणाऱ्या विद्यावेतनाचा चांगलाच आधार झाला. काम थांबवून अभ्यासाकडे जास्त वेळ देता आला. परिस्थिती सुधारली. आज बार्टीमुळे आईवडिलांचे व माझे ऑफिसर होण्याचे स्वप्न साकार करू शकलो असे अमरावती येथील रोशन कडू, यशस्वी यांनी सांगितले.



या सर्व योजनांची विस्तृत माहिती बार्टीच्या www.barti.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी या सर्व योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा.

सुनील वारे, महासंचालक बार्टी
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!