मांडवे खुर्दच्या जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

Cityline Media
0

मांडवे खुर्द ( प्रतिनिधी) पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकतेच महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला शाळेच्या प्रांगणात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेत वर्षभरात विविध उपक्रम राबविले जातात. त्यापैकीच एक म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन होय,येथील चिमुकले विद्यार्थी या संमेलनात चैतन्याने सहभागी झाले होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.कार्यक्रमास राष्ट्रवादी युवती काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष कु.संध्या सोनवणे, मशाल फाउंडेशनचे कार्यकारी संचालक निलेश करकरे, सौ.दीपाली दाते,केंद्रप्रमुख रविंद्र अनाप साहेब,सरपंच सौ.कमल गागरे,उपसरपंच सौ.मानिषा जाधव,चेअरमन तुकाराम जाधव  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी होत १३ बहारदार कार्यक्रमांचे उत्कृष्ट सादरीकरण केले.त्यातील  पुलवामा हल्ला व शिवतांडव नृत्याने उपस्थितांची मने जिंकली.आणि प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून त्यांना दाद दिली.

या कार्यक्रमातून जवळपास दिड लाख रुपये निधी जमा झाला आहे.हा निधी शाळेतील भौतिक सुविधा व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या दृष्टीने विकासकामांसाठी वापरला जाईल असे शाळेचे मुख्याध्यापक बाबाजी ढोकळे  यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मा. सरपंच सोमनाथ आहेर, ग्रामपंचायत सदस्य जगदीश गागरे, गौतम बागुल,सौ.रेश्मा गागरे,सौ.पूजा गागरे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यशवंत जाधव, उपाध्यक्ष संतोष फटांगरे, व सर्व सदस्य,कैलास गागरे,विलास गागरे,मंगेश गागरे, ज्ञानेश्वर हारदे, यांनी विशेष परिश्रम घेतले 

विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाचे नेपथ्यकार शाळेतील  शिक्षिका श्रीमती मंगल झावरे, श्रीमती लता शिरसाठ व सौ.प्रितम बर्वे यांनी महत्वाची भूमिका निभावली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बाबाजी ढोकळे यांनी केले तर सूत्रसंचालन शिक्षक दत्ता रोकडे  व संदिप गाडे  यांनी केले व आभार संदिप झावरे यांनी मानले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!