हिंदुस्तान टाइम्स ची रिपोर्टर अनुश्री काल ज़मिनीवर खाली पडलेल्या एका मुलाला बेरहम पणे मारणा-या पोलिसांचे फोटो काढत होती । जवळच उभ्या असलेल्या एका अधिकाऱ्याने म्हंटले, इसका कैमरा तोड़ दो आणि मग अनुश्री चा कॅमेरा हिसकावून घेतला!
एका दुसऱ्या महिला पत्रकार ला एका पोलिस अधिकाऱ्याने धक्का दिला आणि असं करतं असताना तिची छाती (वक्षस्थळ)दाबली.
नंतर पोलिसांनी असं स्पष्टीकरण दिले की त्या महिला पत्रकारांना तो पोलिस विद्यार्थीनी समजला होता.
आता प्रश्न असा निर्माण होतो की एखाद्या विद्यार्थींनीची छाती दाबणे हा गुन्हा नाही आहे का ? जर नाही तर सरकारने याबाबत घोषणा केली पाहिजे, पोलिस मॅनुअल मध्ये या गोष्टी सामिल तर नाही केल्या ?
फ़र्स्ट पोस्ट चा पत्रकार प्रवीण सिंह यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.
दुसऱ्या अनेक पत्रकारांसोबत असंच काहीसं झालं आहे.
हे सर्व कॅमेरे फ़ोटो जर्नलिस्टांनी पोलिस मुख्यालयाच्या समोर ठेवले आहेत. विरोध करताना काही फोटो बरंच काही सांगून जातात.
- विलास साळवी
