ATAL TINKERING LAB
केंद्र शासनाच्या नीती आयोगामार्फत अटल टिंकरिंग लॅब ही महत्त्वपूर्ण योजना राबविली जाते.माध्यमिक शाळेतील इ. ६वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व गणित या विषयांच्या प्रयोगशाळा उभारण्यासाठी माध्यमिक शाळांना भरीव अर्थ सहाय्य केले जाते. जास्तीत जास्त शाळांपर्यंत ही योजना पोहोचली जावी व त्याचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फायदा व्हावा या उद्देशाने आम्ही "अटल टिंकरिंग लॅब" बाबत जनजागृती व मार्गदर्शन करण्याचे काम आक्टोबर २०२४ पासून सुरू केले. या योजनेत सहभागी होण्यासाठी अनेक शाळांनी आमच्याशी संपर्क साधला आणि या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती.
त्यानुसार डिसेंबर २०२४ मध्ये १८ शाळांचे "अटल टिंकरिंग लॅब" उभारणी बाबतचे प्रस्ताव नीती आयोगाकडे सादर करण्यात आले होते.
कळविण्यास आनंद वाटतो की या प्रस्तावांना नीती आयोगाने प्राथमिक मान्यता दिली असून आता याबाबतची पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे.लवकरच मंजुरी मिळालेल्या शाळांना रु.१२ लक्ष इतके अनुदान प्राप्त होणार आहे.
त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात (२० मार्च २०२५) पर्यंत आणखी २५ शाळांचे प्रस्ताव निती आयोगाकडे पाठविले असून पुढील काही दिवसांत या प्रस्तावांना मंजुरी मिळणे अपेक्षित आहे.
ज्या शाळांना "अटल टिंकरींग लॅब" या योजनेत सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी अधिक माहितीसाठी ९४२२२२२६९५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
