२५ वर्षांनी एकत्र येत रोप्य मोहत्सव निमित्ताने रंगणार गेट टुगेदर
सिन्नर (दिनकर गायकवाड) तालुक्यातील खंबाळे येथील कपिलेश्वर विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा रोप्य महोत्सव मेळावा २३ मार्च रोजी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती येथील माजी विद्यार्थीच्या बैठकीतून मिळाली.
नुकतीच येथील श्री.सिद्ध कपिलेश्वर मंदिराच्या प्रांगणात माजी विद्यार्थ्यांची बैठक पार पडली.यावेळी एकनाथ खाडे, संपत आंधळे मनोहर आंधळे, रामनाथ आंधळे, दत्तू गोसावी,म्हाळू आंधळे, भाऊसाहेब खाडे, मधुकर सुर्वे आदी माजी विद्यार्थी बैठकीस उपस्थित होते.
इयत्ता १ ली ते १० वी पर्यंत या विद्यालयास लाभलेल्या १९९७ बॅच मधील सर्व माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थित हा रोप्य महोत्सव स्नेहसंमेलन मेळावा रविवार दि.२३ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वा.आयोजित केला असल्याची माहिती माजी विद्यार्थ्यांनी दिली.यावेळी इयत्ता १ली ते १० पर्यत सर्व शिक्षकांचा देखील सन्मान करण्यात येणार आहे तरी या रोप्य मोहत्सव मेळाव्यासाठी जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
