आ.अमोल खताळ यांनी विधानसभेत मांडत सरकारचे लक्ष वेधले
संगमनेर (संपत भोसले) संगमनेर शहरात सुरू असणारी गोवंश हत्या तसेच संगमनेर नगरपालिका हद्दीतील मोक्याच्या ठिकाणी असणारे तसेच तालुक्यातील सुकेवाडी घुलेवाडी पारेगाव या देवस्थानाच्या जमिनी वक्फ बोर्डाकडे बेकायदेशीर नोंदणी झाली आहे. हे कधी न गाजलेले मुद्दे आ अमोल खताळ यांनी सर्वप्रथमच विधानसभेत मांडत राज्य सरकारचे या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे.
संगमनेर शहरातील नगरपरिषदेच्या हद्दीतील नवीन नगररोड वरील सर्वे नंबर १४९ (जुना सर्वे नंबर ८०३), क्षेत्र ४ एकर १७ गुंठे या मिळकतीवर तसेच तालुक्यातील घुलेवाडी येथील सर्व्हे नंबर १६२ व,१७९ येथील कानिफनाथ व सुकेवाडी येथील सर्व्ह नंबर १९४ मधील कान्होबा देवस्थान व पारेगाव येथील श्रीअश्विनाथ महाराज मंदिर या देवस्थानांच्य हक्काच्या संपूर्ण जमीनीवर वक्फ बोर्ड चुकीच्या पद्धतीने दावा करत आहे.त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.म्हणून शासनाने या जमिनीबाबत योग्य ती कार्यवाही करून त्या जमीनी परत त्या देवस्थानच्या नावावर करण्यात यावी. तसेच हिंदूं धर्मियांच्या देवस्थानांवर होत असणारे हल्ले थांबले पाहिजे.अशी लक्षवेधी आ अमोल खताळ यांनी विधान सभेमध्ये मांडत या महत्त्वाच्या मुद्याकडे राज्य शासनाचे लक्ष वेधले.
चौकट
संगमनेर शहरात अनेक वर्षापासून बेकायदेशीर कत्तलखाने सुरू आहे या कत्तलखान्याच्या चालक व मालकावर वारंवार कारवाई करून गुन्हे दाखल केले जातात मात्र प्रत्येकवेळी गोवंश कत्तल करणारा माणूस तोच असतो. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर वेगळा माणूस उभा केला जातो. मुख्य आरोपीवर कारवाई केली जात नाही. त्यामुळे त्यांचे चांगलेच फावले जात आहे हिंदुत्ववादी संघटनांनी या कत्तलखान्याच्या विरोधात आंदोलन करूनही ही बेकायदेशीर कत्तलखाने बंद होत नाही त्यामुळे शासनाने आनाधिकृत कत्तल खान्यांवरती योग्य ती कारवाई करून गोवंश हत्या बंदी करावी अशी लक्षवेधी करत आ अमोल खताळ यांनी सर्वप्रथमच संगमनेरमध्ये सुरू असणारी गोहत्या थांबविण्यात यावी अशी लक्षवेधी मांडत राज्य शासनाचे याकडे लक्ष वेधले
चौकट
पुणे जिल्ह्यात ठेऊन,येथील हनुमान नगरमध्ये अनाधिकृत मदरसा व मस्जिद बांधकामामुळे नागरी असुविधा आणि येथील वाहतुकीच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. या भागात अनेक बांगला देशी वास्तव्य करत आहेत. त्यामुळे बळजबरी घरात घुसून स्त्रियांचे विनयभंग आणि अत्याचार यासारखे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे हे मदरसे ,आणि मस्जिद जमीनदोस्त करावी अशी लक्ष वेधी आ अमोल खताळ यांनीयावेळी केली
चौकट
पुणे जिल्ह्यात थेऊर येथे अनाधिकृत बांधकाम झाले आहे. त्यावर कारवाई करण्याचे अधिकार महापालिकेचे किंवा नगरपालिकेचे आहे. तरी तुम्ही केलेल्या लक्षवेधीची राज्य शासनाने दखल घेतली आहे संबंधित संस्थेला योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देत आहे. संगमनेर मतदार संघामध्ये अनेक चुकीच्या घटना घडत आहे. या बाबत सविस्तर माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल = ना डॉ पंकज भोयर गृहनिर्माण राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य
