जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांचा भव्य नागरी सत्काराचे आयोजन
संगमनेर प्रतिनिधी / नितीनचंद्र भालेराव
श्री.श्री.१००८ श्री.तपस्वी छावनी पीठाधीश्वर श्री. जगद्गुरु परमहंस आचार्य (श्री तपस्वी जी की छावनी रामघाट तिराहा श्री अयोध्या धाम),जगदगुरू परमहंस आचार्य यांचे उत्तर अधिकारी एकनाथ महाराज कृपा पात्र शिक्ष राजश्री महंत अयोध्या धाम यांचे २९ मार्च२०२५ रोजी, सकाळी ९ वा.हिवरगाव पावसा येथे आगमन होणार आहे.
त्या प्रसंगी महाराजांची रथ यात्रा, प्रवचन,दर्शन सोहळ्याचे आणि महाप्रसादचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी ना.राधाकृष्ण विखे पाटील,जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल आणि
आमदार.अमोल धोंडीबा खताळ संगमनेर विधानसभा आमदार पदी निवड झाल्याबद्दल हिवरगाव पावसा गावातील सर्व संस्था पदाधिकारी व ग्रामस्थांनी
भव्य नागरी सत्काराचे आयोजन केले आहे.सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती डॉ .सुजय विखे पाटील यांच्या सह इतर मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत.
तरी सदर कार्यक्रमास संगमनेर तालुक्यातील सर्व भाविक भक्त,कार्यकर्ते,महायुतीतील पदाधिकारी,हिवरगाव पावसा पंचक्रोशीतील नागरिकांनी
उपस्थित राहण्याचे आवाहन ओजस्वी भारत फाउंडेशनचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष उत्तम नाना जाधव,भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे,
भाजपा तालुका उपाध्यक्ष गणेश दवंगे,केशव दवंगे,गणेश पावसे कैलास दिवटे,सोमनाथ दवंगे, सोमनाथ भालेराव,नितीन भालेराव,दिपक भालेराव यांच्या सह हिवरगाव पावसा येथील सर्व संस्था पदाधिकारी व ग्रामस्थांनी केले आहे.