श्रीरागपूर (दिपक कदम) श्रीरामपूर नगरपालिकेचे १०० दिवशीय ७ कलमी कृती आराखडा या उपक्रमा अंतर्गत बीज गोळे तयार करणे या उपक्रमासाठी श्रीरामपूर
नगरपालिकेने शहरातील बचतगट व शहरातील नगरपालिका शाळा यांचा समावेश करत येथील लोकमान्य टिळक वाचनाळ्यात मुख्याधिकारी
मच्छिंद्र घोलप यांचे मार्गदर्शनाखाली बीज गोळे तयार करणे उपक्रम नुकताच घेण्यात आला.
बिया गोळा करणे,सेंद्रीय खत व माती एकत्रित करून बीज गोळे तयार करून ४० तास अंधाऱ्या खोलीत ठेवून पावसाळ्यात त्याचा वापर वर करावा याचे प्रात्यक्षिक यावेळी घेण्यात आले.
प्रसंगी दुसरा उपक्रम पालिका शाळेतील विद्यार्थी इंग्रजी वाचतात खडाखडा ! हा उपक्रम प्रशासनाधिकारी संजीवन दिवे यांनी राबविला त्याचे प्रात्यक्षिक श्रीरामपूर नगरपालिकेत मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप याचे समक्ष घेण्यात आले त्याचे कौतुक घोलप यांनी केले.
या कार्यक्रमासाठी उपमुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, उपमुख्याधिकारी महेंद्र तापकीर,प्रशासनाधिकारी संजीवन दिवे ग्रंथपाल स्वाती पूरे बचत गट प्रमुख वर्षा पाठक आस्थापना प्रमुख प्राची चितळे.रूपेश गुजर किशोर त्रिभुवन शहर समन्वय प्रमोद चव्हाण,मंगल रेड्डी,साक्षी आहिरे राज् बोरकर यश आहिरे स्वप्नील माळवे राजेश जेधे, विजय सिंगारे दिपक व्यवहारे सिद्धार्थ गवारे, नवनाथ अकोलकर,संभाजी त्रिभुवन शहरातील बचतगट व नगरपालिका यांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.