उपभोगशुन्य स्वामी-प्रा.शंकराव हजारे पा.
मानवाच्या धकाधकीच्या जीवनात तो समाजप्रिय घटक बनून आपल्या विचाराचे वारू चौफेर उधळीत आहे.समाजात राहताना त्याला सगळ्यांशी संवाद साधावाच लागतो कारण आर्थिक,सामाजिक कौटुंबिक अशा कोणत्याही क्षेत्रात वावरतांना त्याचा इतरांशी संपर्क येत असतो.
अशावेळी सुसंवाद साधल्यास कार्याला गती मिळते नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाची जवळीक साधत नाही,मनुष्य हा तिरस्कार भावनेच्या आधारे जगु शकत नाही,तो प्रेमाच्या आधारावर भक्कम उभा राहतो असा आत्मविश्वास आणि नेहमी सकारात्मक विचार मांडणारे
संगमनेर तालुक्यातील चणेगाव तेथील सामाजिक कार्यकर्ते मा.प्रा.शंकराव हजारे पा.आज त्यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने..
सामाजिक कार्यात हिरहिरीने निस्वार्थीपणे नेहमी सहभागी असलेले हजारे सर यांचे मुळ गाव पानोडी(हजरवाडी)असून त्यांचे मन मात्र आपल्या कर्मभुमीतच
म्हणजे चणेगावातच रमले आहे ते उच्च शिक्षित असून समाज कार्यात नेहमी सहभागी असतात.अनेकांच्या सुख दुःख समयी नेहमी धावून येत असतात अतिशय संवेदनशील असलेल्या दोस्तीच्या पर्वातील नवा अध्याय रचणारा तळमळीचा कार्यकर्ता,ज्याच्या जीवनात पैश्याला नेहमी दुय्यम स्थान आहे.
पैसा मिळविला की माणूस सुखी होतो अशी आज प्रत्येकाची विचारसरणी झालेली दिसून येते त्यासाठी जो तो त्वरित पैसा कसा कमवावा याचाच विचार करताना दिसतो मग संपत्तीच्या मागे पळणारा माणूस माणुस्कीला विसरतो पण पैसा हे फक्त साधन आहे हे तो विसरतो,विकत घेतलेल्या सर्वच वस्तू मानसिक सुख देतील असे नाही पैश्यापेक्षा मानवता महत्वाची असे अशी माणूसपणाची भिंत जपणारे प्रा.शंकराव हजारे पा.म्हणजे जवळपास उपभोगशुन्य स्वामीच...
वाढदिवस एका युवा नेतृत्वाचा..
वाढदिवस एका संयमी मनाचा..
वाढदिवस एका उज्वल भविष्याचा..
वाढदिवस समतामुलक अभियानाचा..
वाढदिवस एका मनाच्या श्रीमंतीचा...
वाढदिवस एका कुशल संघटकाचा..
वाढदिवस एका सुसंस्कृत विचाराचा..
वाढदिवस एका विशाल नम्रतेचा..
वाढदिवस आपल्या माणसाचा..
वाढदिवस आमच्या भाऊचा..
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा सर
Wish You Happy Birthday..
-महेश भोसले -संगमनेर
manavmudrasvs2021@gmail.com
