अहिल्यानगर -कोल्हापूर येथील ज्येष्ठ समाजसेविका कांचनताई परुळेकर यांच्या निधनाने एक त्यागी व निस्वार्थी व्यक्तिमत्व हरपले असून त्यांच्या निधनाने महिला चळवळीची न भरून येणारी हानी झाली आहे." अशा शब्दात अहिल्यानगर येथील महिला सक्षमीकरण क्षेत्रात कार्यरत करणारे भाजपा नेते आणि कौशल्य विकास समितीचे सदस्य. विनायक देशमुख यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
स्वर्गीय कांचनताई परुळेकर यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना श्री. देशमुख म्हणाले, " डिसेंबर २०२४ मध्ये कोल्हापूर दौऱ्यावर असताना कांचनताई परुळेकर यांच्या "स्वयंसिद्धा" संस्थेस भेट देण्याचा योग आला होता. त्यावेळी कांचन ताईंच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले संस्थेचे कार्य समजून घेण्याची संधी मला मिळाली. महिलांना स्वावलंबी व सक्षम करण्यासाठी त्यांनी जवळपास मागील ३० वर्षे आपले आयुष्य या कामासाठी समर्पित केले होते.सध्याच्या काळात इतक्या त्यागी वृत्तीने काम करणारी माणसे दुर्मिळ झाली असून त्यांच्या अनपेक्षित निधनामुळे महिला चळवळीची मोठी हानी झाली आहे. स्वर्गीय कांचनताई परुळेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
