संगमनेर (प्नतिनिधी) व्हॉईस ऑफ मीडिया व एसएमबीटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात तज्ञ संगमनेर येथील पत्रकारांची डॉक्टरांनी आरोग्य तपासणी नुकतीच केली.
तालुक्यातील घुलेवाडी येथे असलेल्या एसएमबीटी क्लिनिक अमृतवाहिनी रुरल अँड हॉस्पिटलमध्ये व्हॉईस ऑफ मीडिया व एसएमबीटी क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जवळपास २५ पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली.त्यामध्ये ब्लड प्रेशर,ब्लड टेस्टिंग, लिपिड प्रोफाइल,
इंसिजी, २ डी इको,टीएमटी आदी प्रकारच्या खर्चिक तपासण्या मोफत करण्यात आल्या. त्यानंतर डॉ. गौरव वर्मा यांना सर्व रिपोर्ट्स दाखवण्यात आले. डॉ. गौरव वर्मा व श्रीराम कुन्हे यांचा प्रसंगी व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने सत्कार
करण्यात आला तपासणीनंतर कोणाला त्रास असल्यास त्याच्यावर घोटी येथील एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपचार केले जाणार असल्याची माहिती यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता अभंग यांनी दिली.यावेळी हॉस्पिटलमधील सर्व कर्मचाऱ्यांनी
मोलाचे सहकार्य केले.या शिबिरामध्ये जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने, उपाध्यक्ष बाळासाहेब गडाख,सचिव अमोल मतकर,खजिनदार गोरक्ष नेहे,संगमनेर तालुकाध्यक्ष बाबासाहेब कडू,शहराध्यक्ष भारत रेघाटे, सचिव सचिन जंत्रे, संजय अहिरे,शेखर पानसरे, चंद्रकांत शिंदे,सुभाष भालेराव, आनंद गायकवाड, नौलिमा घाडगे, नवनाथ गाडेकर, नवनाथ वावरे, दत्तात्रय घोलप, सुखदेव गाडेकर, सुनील महाले, चंद्रकांत महाले, सचिन मदने आदींनी सहभाग घेतला होता.
संगमनेर येथील पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेतले पाहिजे अशी संकल्पना नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने यांच्याकडे मांडली.त्या अनुषंगाने जिल्हाध्यक्ष मदने यांनी त्वरित याबाबतचा पाठपुरावा केला. त्यानुसार ही आरोग्य तपासणी एसएमबीटीत पार पडली.