संगमनेर (संपत भोसले) अहिल्यानगर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांचा अभिष्टचिंतन सोहळा दिनांक १ एप्रिल २०२५ रोजी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या ठिकाणी होणार असल्याची माहिती संगमनेर तालुक्यातील पठार भागाचे रिपाईचे विभाग प्रमुख सागर रमेश शिंदे यांनी दिली.
अभिष्टचिंतन दिनी सकाळी ९ वाजता मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोफत चष्मा वाटपाने सोहळ्याचे सुरुवात होईल, दिवसभर रक्तदान शिबिर, महिलांसाठी पैठणी वाटप, सायंकाळी ६ वाजता ह .भ .प शालिनी इंदुरीकर यांचे जाहीर हरी किर्तन होईल यानंतर आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना स्नेहभोजन देखील नियोजित केले आहे या कार्यक्रमासाठी संगमनेर पठार भागातील व तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी आव्हान पठार भागातील कार्यकर्त्यांनी केले आहे.
संगमनेरचे तालुका अध्यक्ष आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील दिशा ठरवून आपल्याला कळवले जाईल असे देखील यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले. अंतिमतःबोलताना सागर शिंदे यांनी सांगितले की अभिष्टचिंतन सोहळ्यास मोठ्या संख्येने महिला भगिनी सह सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन श्री शिंदे यांनी केले.