"विद्या" विद्यापीठाचे आयोजन
संगमनेर (प्नतिनिधी) जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून तालुक्याच्या घुलेवाडी येथील यशोदिप सेलिब्रेशन सभागृहात "विद्या"विद्यापीठ आयोजित आदर्श शिक्षिका पुरस्कार सोहळा २०२५ रविवार ९ मार्चला दुपारी २.३० वा आयोजित केला असल्याची माहिती व्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूट यांच्या वतीने डॉ.नामदेव गुंजाळ यांनी दिली
प्रसिद्ध उद्योगपती व समाजसेविका पद्मश्री.डॉ. कल्पना सरोज यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार असुन व्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. हर्षवर्धन गुंजाळ यांच्या प्रमुख उपस्थित हा वितरण सोहळा पार पडणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून सौ.दुर्गा तांबे ह्या असून या अविस्मरणीय सन्मान सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ.नामदेव गुंजाळ यांनी केले.
