संगमनेर आगारात आलेल्या पाच बसेसचे आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते पूजन
संगमनेर (सपंत भोसले) संगमनेर आगारासाठी १० नवीन एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी राज्याचे परिवहनमंत्री नामदार प्रताप सरनाईक यांच्याकडे नुकतीच केली होती.
आमदार खताळ यांच्या मागणीचा विचार करून मंत्री सरनाईक यांनी संगमनेर आगारासाठी ५ नवीन एस टी बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत.उर्वरित ५ एसटी बसेस लवकरच उपलब्ध करून दिल्या जातील असा विश्वास आ. अमोल खताळ यांनी व्यक्त केला
संगमनेर आगारात एसटी बसेस कमी प्रमाणात असल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे त्यामुळे संगमनेर आगारासाठी १० एसटी बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आ.अमोल खताळ यांनी परिवहनमंत्री नामदार प्रताप सरनाईक यांच्याकडे विधानभवनात भेट घेऊन मागणी केली होती त्यानुसार संगमनेर आगारासाठी ५ एसटी बसेस तात्काळ उपलब्ध करून दिल्या जातील.असा विश्वास दिला होता. त्यानुसार शनिवारी संगमनेर आगाराला ५ नवीन एसटी बसेस दाखल झाल्या.त्या बसेसचे पूजन आ.अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आले.
आमदार खताळ म्हणाले की संगमनेर बस स्थानकामध्ये उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्यनेते नामदार एकनाथ शिंदे परिवहनमंत्री नामदार प्रताप सरनाईक पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा.यांच्या माध्यमातून ५ नवीन एसटी बसेस दाखल झाल्या.या एसटी बस मध्ये विधानसभा सदस्य यांच्यासाठी राखीव असलेल्या सीटवर बसून प्रवास केल्याचे मला समाधान आहे.येथून मागील कालावधीत एस टी महामंडळ तोट्यात गेले होते मात्र उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अनेक कल्याण कारी योजना राबविल्या गेल्या आहेत तसेच महिलांना एसटीमध्ये ५० टक्के सवलत दिली गेली आहे.त्यामुळे लाडक्या बहिणींचा एसटी कडे कल वाढला आहे.त्यामुळे तोट्यात गेलेले एसटी महामंडळ नफ्यामध्ये येत आहे.संगमनेर आगाराच्या विकासासाठी लागणारा निधी आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगून आ.खताळ म्हणाले की एस टी बसमधून प्रवास करताना प्रत्येक प्रवाशांनी एस टी बस स्थानकाची आणि बसची स्वच्छता राखावी असे आवाहन आ.खताळ यांनी केले
संगमनेरचे आगार व्यवस्थापक प्रशांत गुंड यांनी आमदार अमोल खताळ यांचा सन्मान केला.या वेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ राहाणे,रमेश काळे,राजेंद्र सोनवणे,शहरप्रमुख दिनेश फटांगरे अंकुश राहणे,श्याम राहणे,आर पी आयचे शहराध्यक्ष कैलास कासार,विनोद सूर्यवंशी सौरभ देशमुख,भाजप ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ ज्ञानेश्वर कर्पे जावेद जाहागीरदार शौकत जागीरदार अशोक कानवडे रौफ़ शेख मयूर दिघे महेश मांडेकर सुरेश लांडगे संगमनेर आगारातील रावसाहेब चकोर नंदू कानकाटे भगवान गिते किसन घुमरे सुदर्शन हेकरे रुपेश टोपे विजय देशमुख करंजकर बापू भुसारी यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
आमदार अमोल खताळ यांनी लालपरी एसटी बसमधून केला प्रवास
-संगमनेर आगारांमध्ये नव्याने दाखल झालेल्या लालपरी एसटी बस मध्ये विधानसभा सदस्यासाठी आरक्षित असलेल्या सिटवर बसून आमदार अमोल खताळ यांनी सर्वसामान्य प्रवाशांप्रमाणे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत एसटी बसमध्ये बसून प्रवास केला.या वेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या जोरदार घोषणा बाजीने एस टी बस स्थानकाचा परिसर दणाणून गेला होता
शहरात स्वतंत्र वाहतूक शाखा कार्यान्वित करु
संगमनेर शहरातील वाहतूक समस्या गंभीर बनली आहे याबाबत उपाययोजना करण्यासाठी पोलीस प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत.त्यानुसार लवकरच संगमनेर शहरात स्वतंत्र वाहतूक शाखा कार्यान्वित केली जाईल.आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविला जाईल असे आ.खताळ यांनी सांगितले.
आमदार अमोल खताळ
सदस्य- संगमनेर विधानसभा