डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रभक्तीचा एक प्रसंग असा आहे,तेव्हा भारतात ए.एन. खोसला या नावाचे नामवंत इंजिनिअर होते.भाक्रा नांगलपासूनची मोठी धरणे उभी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.त्यांची नियुक्ती सेंटर वॉटरवेल इरिगेशन अँन्ड नेव्हिगेशन कमिशनवर चेअरमन म्हणून झाली.
या कमिशनवर एका इंग्रज माणसाची नेमणूक केली जावी,असा इंग्रज मंत्र्यांचा आणि अधिकाऱ्यांचा आग्रह होता.डॉ.बाबासाहेबांची इच्छा एका भारतीयाने हे काम करावे,अशा शिफारशीतून.ए.एन. खोसला यांचे नाव पुढे आले.
बाबासाहेबांनी खोसला यांना भेटीस बोलावले आणि ते त्यांना म्हणाले, या जागेवर इंग्रजांची नियुक्ती करावी म्हणून माझ्यावर प्रचंड दडपण येत आहे. परंतु माझी इच्छा आहे की एका भारतीयाने ही जबाबदारी घ्यावी. तुम्ही ती घेऊ शकता. ए.एन.खोसला यांनी तत्काळ होकार दिला.
ही होती बाबासाहेबांची स्वदेशी दृष्टी.डॉ.बाबासाहेब देशाची दुबळी राज्यसत्ता स्विकारण्यास तयार नाहीत. भारताचा इतिहास काय सांगतो? तो हेच सांगतो की, जेव्हा जेव्हा भारताची केंद्रसत्ता दुर्बळ झाली तेव्हा तेव्हा भारत परकीय आक्रमणाचा शिकार झाला आहे.या इतिहासाची पुनरावृत्ती बाबासाहेबांना नको होती.म्हणून त्यांनी आणीबाणीच्या परिस्थितीत केंद्राने सर्व सत्ता हाती घेण्याची व्यवस्था राज्यघटनेत करून ठेवली आहे.
