पारनेरच्या निघोज जलजीवन पाईप चोरी प्रकरणी ठेकेदाराची भुमिका संशयास्पद

Cityline Media
0
-शासन म्हणते २१ लाखाची चोरी झाली
-ठेकेदार अनिल आदेश कोठारी यांनी पारनेर पोलिस ठाण्यात दिली १२ लाखाची फिर्याद 
-उर्वरित पाईप चोरी प्रकरणी ठेकेदाराची मुगगिळीची भूमिका; अधिकारी अडकणार 

निघोज (प्नतिनिधी) पारनेर तालुक्यातील जल जीवन मिशन योजने अंतर्गत प्रगती पथावरील असलेल्या निघोज आणि ४ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील चोरी गेलेल्या (डी एल.के ७ ) पाईपची किंमत फिर्याद दाखल करताना कमी दाखवून ठेकेदार शासनाची दिशाभूल करत असल्याची तक्रार येथील मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त मंगेश सखाराम वराळ यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे केल्याने ठेकेदार आणि अधिकारी वर्गात चांगलीच खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रगतीपथावरील निघोज आणि ४ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना येथील पाईपची चोरीबाबत मंगेश वराळ यांनी वेळोवेळी संबंधित प्राधिकरणास पत्र व्यवहार केला होता श्री.वराळ यांच्या तक्रारीवरून संबंधित ठेकेदाराकडे जल जीवन मिशन प्राधिकरणाने विचारणा केली असता पाईप चोरीला गेले बाबतची माहिती त्यांनी प्राधिकरणाला दिली मात्र ठेकेदाराला लेखी पत्र दिले की तुम्ही पारनेर पोलीस ठाण्यात पाईप चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करा त्या पत्रकान्वये पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
परंतु संदर्भित पत्र क्रमांक १ नुसार चोरीस गेलेल्या पाईपची किंमत २०९६६३२.५० रुपये किंमतीच्या पाईपची चोरीची फिर्याद देण्यासाठी ठेकेदाराला प्राधिकरणाने कळविले होते.
परंतु संदर्भित पत्र २ नुसार फिर्याद दाखल करताना ठेकेदार अनिल आदेश कोठारी यांनी मात्र संबंधित चोरीस गेलेल्या पाईपची किंमत १२०६००० रुपये असल्याचे लेखी जबाब दिला म्हणजे चोरी गेलेल्या पाईपची किंमत ८९६३२.५० रुपयांनी कमी कशी दाखविली असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडणारच! 

फिर्याद देताना चोरीस गेलेल्या पाईपची किंमत कमी दाखवल्याने शासनाची फसवणूक करून पोलीस प्रशासनाची दिशाभूल करून संबंधित चोरी करणाऱ्यास मदत करण्याचे हेतूने ठेकेदाराने फिर्याद दाखल केली असल्याचे बोलले जातेय तसेच इतर पाईप देखील इतरत्र कुठेतरी लंपास केले असल्याची ग्रामस्थ तक्रार करत आहे.याबाबत संबंधित ठेकेदार यांना देखील पूर्वकल्पना होती आता मात्र याबाबत ते मुगगिळीची भूमिका निभावत आहे तरी याबाबत शासनाच्या फसवणुकी बद्दल ठेकेदार आदेश अनिल कोठारी यांची तात्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी निघोज ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य मंगेश सखाराम वराळ यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!