विखे यांची दुरदृष्टी महिलांना सक्षम बनविणारी-विनायक देशमुख

Cityline Media
0
अकोले येथे एकल महिला मेळावा उत्साहात

अकोले (प्नतिनिधी)
पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या दूरदृष्टीमुळे जिल्ह्यातील एकल महिला सक्षमीकरण कार्यक्रमास गती मिळाली आहे, असे प्रतिपादन कौशल्य विकास समितीचे सदस्य विनायक देशमुख यांनी केले.
अकोले येथे साऊ एकल महिला संस्थेच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात देशमुख बोलत होते. याप्रसंगी शिक्षण क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अँड वसंत मनकर, साऊ संस्थेच्या अध्यक्षा प्रतिभा कुलकर्णी, अहिल्यानगर येथील आय. एस. डी. टी. च्या संचालिका पूजा देशमुख, नगरसेविका प्रतिभा मनकर, रवींद्र मालुंजकर, विद्याचंद्र सातपुते, निलेश तळेकर यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

देशमुख म्हणाले, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तिसऱ्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने

पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. प्रामुख्याने एकल महिलांच्या सक्षमीकरणावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून त्यांच्यासाठी प्रशिक्षण, उत्पादन, बाजारपेठेची सांगड या माध्यमातून कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून

एकल महिला समिती अकोले थापले स्वागत करीत आहे
देण्याची विखे यांची संकल्पना आहे. यादृष्टीने जिल्ह्यातील एक महिलांचे सर्वे क्षण पूर्ण झाले असून लवकरच याबाबतची पुढील दिशा स्पष्ट केली जाईल.

अँड. वसंतराव मनकर यांनी, महिलांच्या प्रशिक्षणासाठी व त्यांनी तयार केलेल्या मालाच्या विक्रीसाठी आपण आवश्यक जागा उपलब्ध करून

देऊ, असे आश्वासन दिले. आय.एस.डी. टी. च्या संचालिका पूजा देशमुख यांनी आपले अनुभव सांगताना विस्तारत चाललेला गारमेंट उद्योग लक्षात घेता महिलांनी याचा जास्तीत जास्त लाभकरून घेणे आवश्यक आहे. असे सांगितले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!