भाडोत्री पोकलेन मार्फत ४८ लाखाची फसवणूक

Cityline Media
0
पोकलेन मशीन परस्पर इतरांना देऊन ४८ लाखांची फसवणूक

नाशिक (दिनकर गायकवाड )
भाडेतत्त्वावर पोकलेन मशीन घेऊन त्याचे भाड्याचे पैसे न देता उलट फिर्यादीकडून ५४ हजार रुपये घेऊन पोकलेन मशीन परस्पर इतर लोकांना देऊन ४८ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी याबाबत दिलेली माहिती अशी,की फिर्यादी अजित बाबू बिचकुले (रा. मदनवाडी,ता. इंदापूर,जि. पुणे) यांचे स्वतःच्या मालकीचे घुंडाई कंपनीचे पोकलेन मशीन आहे. आरोपी अमोल दिलीप मोरे व अजित दिलीप मोरे (दोघेही रा. देवळाली गाव,नाशिकरोड) यांनी

 बिचकुले यांच्याशी संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन केला व त्यांचे पोकलॅन मशीन भाडेतत्त्वावर घेतले; मात्र फिर्यादीला पोकलेन मशीनच्या भाड्याचे एकूण १६ लाख १५ हजार रुपये न देता उलट शासकीय बिल काढण्यासाठी फिर्यादीकडून ५४ हजार रुपये घेतले.

 त्यानंतर फिर्यादीच्या मालकीचे ३२ लाख रुपये किमतीचे पोकलेन मशीन परस्पर विजय पाटील व संतोष पाटील (रा. वेल्हाळे, ता. भुसावळ, जि. जळगाव) यांना देऊन फिर्यादी बिचकुले यांची फसवणूक केली. हा प्रकार दि. २२ जुलै २०२४ ते ७ एप्रिल २०२५ दरम्यान नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरात घडला असुन या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मोरे बंधूंविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!