नाशिक दिनकर गायकवाड) तुम्ही खाता त्या भाकरीवर.. बाबासाहेबांची सही आहे हो,डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो,अशा घोषणांच्या निनादात महामानव,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नाशिकरोड पूर्व भागातील गावांमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
पळसे गावातील बौद्ध स्मारकात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.आंबेडकर याच्या पुतळ्यास सरपंच ताराबाई गायधनी व माजी सरपंच अजित गायधनी याच्या हस्ते पुष्पहार अर्पण करीत मेणबत्ती लावून पूजन करण्यात आले.
तुम्हाला तुमचे हक्क मिळवायचे असतील संघर्ष करायला शिका. त्यानंतरच तुम्हाला तुमचे हक्क मिळतील, असे डॉ.बाबासाहेब डॉ.आंबेडकर म्हणत.
"शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिईल, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही," असे डॉ. आंबेडकर नेहमी सांगायचे, असे प्रतिपादन माजी सरपंच अजित गायधनी यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध संस्था, सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पळसे ग्रामपालिका आदी ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गौतम चंद्रमोरे, उपाध्यक्ष मनोज भवार, ओम् पवार, कार्याध्यक्ष राहुल चंद्रमोरे, खजिनदार विशाल चंद्रमोरे, सन्नी वाडेकर, सिद्धार्थ साळवे, सुरेश मोहिते,
साहिल चंद्रमोरे, रुद्राक्ष चारस्कर, आदित्य गोरे आदी पदाधिका-यांसह उबाठाचे तालुकाप्रमुख दीपक गायधनी, उपजिल्हाप्रमुख सुनील गायधनी, माजी सरपंच नवनाथ गायधनी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायधनी, उत्तम चंद्रमोरे, समाधान गायधनी, संदीप गायधनी, पोलीस पाटील सुनील गायधनी, नितीन चंद्रमोरे, आकाश चंद्रमोरे, दशरथ चंद्रमोरे, किरण नरवडे, विलास चौधरी, नितीन ढेरिंग, ईश्वर गायखे, पांडुरंग ढेरिंगे, राजू नरवडे, शांताराम जाधव, गणेश आगळे आदींसह भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
