संताजी धनाजी कार्यकर्ता पुरस्काराने आप्पासाहेब ढूस सन्मानित

Cityline Media
0

संभाजीनगर (प्नतिनिधी) अप्पर वैतरणेचे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी नदीतून मराठवाडयाला मिळण्यासाठी आवाज उठवल्या बद्दल व त्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाचे व प्रहार दिव्यांग क्रांती संस्थाच्या वतीने प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चु कडू यांचे हस्ते असामान्य योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा देवळाली प्रवरा येथील प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांना संताजी धनाजी कार्यकर्ता पुरस्कार मधील संत गाडगे बाबा सामाजिक सेवा पुरस्कार २०२५ विभागातून तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार देवून नुकतेच सन्मानित करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर येथील महानगर पालिकेच्या संत एकनाथ रंगमंदिरात चार जिल्ह्यातील हजारो प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या साक्षीने त्यांना हा पुरस्कार सपत्नीक प्रदान करण्यात आला.

प्रसंगी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाचे आप्पासाहेब ढूस यांनी ऋण व्यक्त केले.
यावेळी समवेत निरीक्षक घनश्याम पेठे, जिल्हा प्रमुख माऊली ज्ञानेश्वर सांगळे दक्षिण जिल्हा प्रमुख श्री.परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!