संगमनेर तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडत पारदर्शकपणे आणि उत्साहात संपन्न
संगमनेर (नितीनचंद्र भालेराव)
संगमनेर तालुक्यातील एकूण १४४ ग्रामपंचायतींच्या सन २०२६ ते २०३० या कालावधीतील सरपंच आरक्षण सोडत प्रक्रिया बुधवारी सकाळी ११ वाजता उपविभागीय कार्यालयातील सभागृहात उत्साहात पार पडली.
अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ११ ग्रामपंचायतच्या जागा तर अनुसूचित जमातीसाठी २४ जागा आरक्षित करण्यात आल्या तसेच प्रवर्गासाठी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ३९ जागा निश्चित करण्यात आल्या तर ७० ग्रामपंचायतीत सरपंच पद हे खुला प्रवर्गासाठी असेल.सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम तहसिलदार धीरज मांजरे यांच्या उपस्थितीत पार पडला,नायब तहसिलदार सुभाष कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.तर महिला आरक्षण सोडत २५ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता काढण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,इतर मागासवर्ग व खुला प्रवर्ग यामधील आरक्षण यासाठी ही सोडत पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली. कार्यक्रम दरम्यान तहसिलदार धीरजकुमार मांजरे यांनी आरक्षण प्रक्रिया,नियमावली व त्यामागील उद्देश स्पष्ट करून नागरिकांमध्ये जागृती निर्माण केली.सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका प्रशासनाने उत्कृष्ट नियोजन केले होते.नियोजनाचे सर्व स्तरांवरून कौतुक करण्यात येत आहे.
प्रवर्ग निहाय सरपंच पदाचे आरक्षण पुढील प्रमाणे:
अनुसूचित जाती प्रवर्गासाठी : गुंजाळवाडी,देवगाव,सांगवी,ओझर बुद्रुक,धांदरफळ बुद्रुक, अंभोरे,डिग्रस,खांबे,निमगाव खुर्द,पिंपळगाव कोंझिरा
अनुसूचित जमाती :
शिंदोडी,चणेगाव,उंबरी,लोहारे, खरशिंदे,मिर्झापूर,संगमनेर खुर्द, औरंगपूर,सावरगाव तळ,नान्नज दुमाला,पिंपळे,सोनोशी,वरवंडी, तीगाव,कोकणगाव,सावरगाव घुले,धांदरफळ खुर्द,जाखुरी, ढोलेवाडी,निमगाव जाळी,खळी, कोल्हेवाडी,मानोली,मालुंजे
नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग :
शेंडेवाडी,काकडवाडी,सारोळे पठार, पिंपारणे, चिकणी, कनोली वेल्हाळे,माळेगाव हवेली, सावरगाव चोळ, पिंपळगाव माथा,जांबुत बुद्रुक,कर्जुले पठार, झरेकाठी, प्रतापपूर,जोर्वे,आश्वी खुर्द,पारेगाव खुर्द,ओझर खुर्द, निमाज,घुलेवाडी,वडगाव पान, वरझडी बुद्रुक बेरेवाडी शिरापूर हे आळी पाळी नियमानुसार तर चिट्ठीद्वारे साकुर,खंदार माळवाडी,महालवाडी,आश्वी बुद्रुक,दाढ खुर्द,सामनापूर, जांभळवाडी ,खराडी,बोरबान वाडी,सातपूर,हंगेवाडी,मालदाड,
सर्वसाधारण :
कोळवाडे,चंदनापूरी,कौठे कमळेश्वर,जवळे बाळेश्वर,
भोजदरी,चिखली,अकलापूर,कौठे खुर्द,कौठे मलकापूर,
मेंढवण ,म्हसवंडी,वडझरी खुर्द,डोळासणे,सुकेवाडी,कौठे बुद्धक,कोची,मंगळापूर,कासारे, माळेगाव पठार, घारगाव,
बोटा,कनकापूर,नांदुर खंदरमाळ,कुरकूटवाड़ी,आंबी खालसा, रणखांबवाडी,नांदुरी दुमाला,मांडवे बुद्रुक ,निमगाव बुद्रुक राजापूर, रायतेवाडी,निमोण,
कौठे धांदरफळ,शिबलापूर, पारेगाव बुद्रुक,हिवरगाव पावसा,वरुडी पठार,वाघापूर,देवकौठे,पोखरी बाळेश्वर,पिंपळगाव देपा,
करुले,कासारा दुमाला,तळेगाव,
रहिमपूर,निमगाव भोजापूर,