नाशिक (जिमाका) नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या थकीत कर वसुलीसाठी तसेच मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत कार्यालायाच्या आवारात,विविध बस डेपो तथा पोलीस ठाणे यांच्या आवारात जमा करण्यात आलेल्या वाहनांना ६ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे.
संबंधित मालकांनी तडजोड शुल्क,मोटार वाहन कर,पर्यावरण कर भरून येत्या १५ दिवसांत वाहन सोडवून घ्यावीत,असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड यांनी पत्रकान्वये केले आहे.जप्त केलेल्या वाहनांपैकी २२ वाहनांच्या प्रकरणांमध्ये वाहन मालक,चाल किंवा वित्तदात्यांनी कार्यालयाशी संपर्क केलेला नाही तसेच वाहन सोडवून घेण्याबाबत हक्क सांगितलेला नाही. या २२ वाहनांची
जाहीर ई-लिलावाची प्रकिया सुरू करण्यात आली आहे. संबंधित वाहनांची यादी परिवहन कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित केलेली आहे.वाहन सोडवून घेण्याची मुदत संपल्यानंतर ही वाहने बेवारस असल्याचे समजून त्यापैकी रस्त्यावर वापरण्या योग्य वाहनांचा आणि १५ वर्षे पूर्ण झालेल्या व वापरण्या योग्य वाहनांचा सक्षम प्राधिकाऱ्यांच्या परवानगीने या वाहनांचा लिलाव www.eauction.gov.in या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी www.eauction.gov.in या संकेतस्थळावर अथवा प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेठ रोड, पंचवटी, नाशिक ४२२००९ येथे संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
