नाशिक (दिनकर गायकवाड)
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या पिंपळगाव बसवंत येथे क.का. वाघ कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भीमजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी हा उपक्रम हा उपक्रम राबविला.
सकाळी महाविद्यालयातील परिसर स्वच्छ करण्यात आला. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी निफाड फाटा येथे भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळील सर्व परिसराची स्वच्छता करण्यात आली.
भगवान बुद्ध व अन्य प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयीन युवक-युवतींमधे
थोर पुरुषांबद्दलचे प्रेम, आदरभाव, त्यांच्या कार्याची महती समजावी, तसेच त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्ती, पर्यावरण जागरुकता, सामाजिक बांधिलकी, सृजनशीलता, आपुलकी, स्नेहभाव, सेवाभाव, नीटनेटके पणा, स्वच्छता, साफसफाई आदींबद्दलचे कौशल्य निर्माण होऊन वाढीस लागावे, याकरिता अशा प्रकारचे उपक्रम आम्ही नेहमीच राबवितो, अशी माहिती महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. दिलीप माळोदे यांनी याप्रसंगी बोलताना दिली.
महाविद्यालयात देखील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित ऑनलाईन स्वरूपात 'प्रश्नमंजूषा' घेण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थी व शिक्षकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे यांनी केले आहे.
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. संपत खैरनार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील ग्रंथपाल प्रा. अमोल मेहेंदळे, कनिष्ठ विभागाचे प्रा. कैलास घुमरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम
अधिकारी प्रा. निशांत वडघुले, प्रा. उषा कदम, प्रा. गवळी, प्रा निर्मला जाधव, तसेच शिक्षकेतर कर्मचारी सेवक हरी पवार, चंद्रकांत ठाकरे, दीपक बनकर, बाजीराव गडाख, शिवप्रसाद गवळी, कार्तिक मोरे, राजू मोरे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. उषा कदम यांनी केले, तर आभार प्रा. निशांत वडघुले यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नॅक समन्वयक डा. नरेंद्र पाटील, आयक्यूएसी समन्वयक प्रा. भगवान कडलग, प्रा. मोहन कांबळे, प्रा. नामदेव गावित, प्रा. निलेश आहेर, प्रा.अजित देशमुख, प्रा.डा. छाया भोज, प्रा. चेतन गागरेपाटील, प्रा. तुषार मोरे, प्रा. हेमंत पाटील आदींनी परिश्रम घेतले.
