श्रीरामपूर (प्रतिनिधी) शहरातील मुक्त पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते दिपक कदम यांची शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण आणि महिला आघाडी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी नुकतीच नव्याने निवड करण्यात आली आहे.
समाजात येणाऱ्या अडीअडचणी सोडवत माहिती अधिकार व पत्रकारिता चळवळ सक्षम करण्याच्या हेतूने संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष हारून अ.समद शेख ,राष्ट्रीय महासचिव योगेश प्र.दंदणे,संचालक तथा राष्ट्रीय
समन्वयक भरत नजन यांनी दिपक कदम यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे.
या निवडीमुळे संघटनेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व संघटनेची ताकद वाढविण्यासाठी निवड केली आहे.त्यामुळे सर्व स्तरातून निवडीमुळे पत्रकार दिपक कदम यांचे अभिनंदन व कौतुक केले होत आहे.
