नाशिक दिनकर गायकवाड
येथील श्री पद्मतारा सामाजिक शैक्षणिक व बहुउद्देशीय संस्था व वाघ श्री क्लासेस यांच्यातर्फे जेलरोड येथील सिटी आर्केड हॉलमध्ये डॉ.बाबासाहेब
आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने सलग १८ तास अभ्यासाचा उपक्रम राबवून बाबासाहेबांना आदरांजली वाहून अभिवादन करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष अविनाश वाघ, सचिव प्रशांत मलठणकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १३ एप्रिल रोजी पहाटे साडेपाच ते रात्री अकरा दरम्यान हा अनोखा उपक्रम झाला. पंचवीस विद्यार्थ्यांनी सहभागी होत अभ्यासाबरोबरच प्रसिद्ध लेखकांच्या पुस्तकांचे वाचन केले.ॲड. धीरज बर्जे, ॲड.चंद्रकांत लोंढे, महेश डोकफोडे आदींनी मार्गदर्शन केले.
माजी सैनिक राजू तनपुरे, बालयेशू सेवादान हायस्कूलचे शिक्षक अशोक जगताप यांनी बाबासाहेबांची जीवनचरित्राची ओळख करून दिली.
श्रद्धा मालुंजकर, स्पंदन चौधरी, साई विभांडक,श्रुती उजागरे, तनुश्री चव्हाण, नंदिनी ठाकूर, कीर्ती सूर्यवंशी, खुशी वाघ, भावेश निकम, गिरीश भागवत, आदेश वाघ, पारस रूपवते, आरती सोनवणे, गायत्री गोतिसे, हर्षद निकाले व ऋषिकेश खुरपे यांनी संयोजन केले.
