श्रीरामपूर दिपक कदम येथील सेंट जॉन दि बॅस्टिस्ट (सी.एन.आय) गोंधवणी श्रीरामपूर येथे भव्य राज्यस्तरीय ख्रिस्ती वधू वर सूचक मेळावा साप्ताहिक उपदेशक व सेंट जॉन दी बाप्टिस्ट चर्च (सी.एन.आय.) यांच्या संयुक्त विद्यमाने,दि. २७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ ते ५ यावेळेत सेंट जॉन दी बाप्टिस्ट चर्च,गोंधवणी ,श्रीरामपूर या स्थळी आयोजित केला आहे.
या भव्य वधू वर मेळाव्यासाठी अध्यक्ष म्हणून सी.एन.आय.चर्च प्रिष्ट इन्चार्ज रेव्ह.अनिल वंजारे, कार्यक्रमाचे उद्घाटक दिग्दर्शक,लेखक, पत्रकार म्हणून नावाजलेले निमिष राफयल लोहाळे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शासकीय वैद्यकीय महाविदयालयाच्या अधिपरिसेविका सुप्रिया निमिष लोहाळे लाभल्या आहेत.
प्रमुख उपस्थिती मध्ये उदयोजक अविनाश काळे,कर सल्लागार संगिता गोडे,संतोष सगळगिळे, श्रीमती सुशीला श्रीसुंदर, उपदेशक साप्ताहिकाचे संपादक जॉर्ज क्षेत्रे,सहसंपादक श्रीमती अनुराधा शिरसाठ, सेंट जॉन दि बॅप्टिस्ट चर्चचे सचिव उदयसेन राठोड,राजेश्वर पारखे, ॲड.प्रदीप सिंग आदिची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
सदरील ख्रिस्ती वधू वर मेळाव्यात सर्व पंथीय विवाहस्थळे पाहण्यासाठी उपलब्ध असतील इतर बाहेरच्या जिल्हातून वधू वरांच्या पालकांनी नोंदणी केल्यास,पण कार्यक्रमास उपस्थित राहू न शकल्यास, त्यांना देखील कार्यक्रमानंतर वधू वरांची यादी व्हाइटसॲप उपलब्ध करून देण्यात येईल. वधू वरांनी समक्ष उपस्थित रहाणे महत्वाचे आहे.नोंदणी केलेल्या सर्व वधूवरांनी आलेल्या सर्वाना स्थळाची यादी देण्यात येईल.तरी सर्व वधूवरांनी व शक्य असलेल्या पालकांनी आपल्या सहभाग नोंदवावा असे आवाहन यावेळी संयोजकांच्या वतीने करण्यात आले.
संपर्कासाठी खालील फोन नंबर व नावे
अविनाश काळे -9823012817
विक्रम गायकवाड -8007836174
जयमाला केदारी-9511762897
लुकस पाटोळे-8208941961
प्रकाश लोंखडे-7448270645
सुधाकर पाटोळे-8149260692