-केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ६१० स्थानावर विजय प्राप्त
-पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा.यांच्याकडून मनस्वी कौतुक
केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण होत दिली आपल्या आईला अनोखी श्रध्दांजली.
आश्वी (संजय गायकवाड)
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अहिल्यानगर जिल्ह्यातील उमेदवारांनी यशाला गवसणी घातली आहे.संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील एका सेवानिवृत्त ग्रामसेवकाच्या मुलाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत संगमनेर तालुक्यातून एकमेव उत्तीर्ण होण्याचा मान त्याने मिळविला आहे.
२०२४ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला.या परीक्षेत संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील सेवानिवृत्त ग्रामसेवक राजेंद बाळकृष्ण गायकवाड यांचा मुलगा ऋुषिकेश राजेंद्र गायकवाड याने यश मिळविले.
११३२ पदांसाठी ही प्रक्रिया राबवण्यात आली. ऋषिकेशने ६१० वा क्रमांक मिळवत या परीक्षेत चौथ्या प्रयन्तांत यश मिळविले तो चार वर्षांपासून विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता ऋषीकेशचे प्राथमिक शिक्षण विद्या विकास पब्लिक स्कुल बाभळेश्वर येथे तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण अमृतवाहिनी मॉडेल स्कुल सह्याद्री ज्युनिअर कॉलेज संगमनेर येथे तर बीएस्सी फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे पुर्ण केले ऋषिकेशचा परिवार शिक्षित असुन आजोबा दिवंगत. बाळकृष्ण गायकवाड आजी दिवंगत.कुसुम गायकवाड वडील सेवानिवृत ग्रामविकास अधिकारी भगिनी सौ.सुजल अतेष्ठ मंदार मामा भाऊ प्रतिक यांच्याकडुन प्रेरणा व पाठबळ मिळाले तर आई दिवंगत.सुनिता गायकवाड ह्या या कृषी सहाय्यक होत्या परंतु दुदैवाने त्यांचे पाच वर्षापुर्वी अपघाती निधन झाले मात्र त्यांचे स्वप्न होते कि ऋषीकेशने स्पर्धा परीक्षा देऊन उच्च पदावर जावे हे स्वप्न उराशी बाळगून त्यांने आईच्या जागेवर अनुकंपावर कृषी सहाय्यक नोकरी करत गेली चार वर्षे दररोज चौदा तास अभ्यासात स्वतःला झोकून दिले मित्र नातलग यांची साथ लाभत गेली आणि पुणे येथे दोन वर्ष खाजगी संस्थेत अभ्यास केल्यानंतर दिल्ली येथे दोन वर्ष अभ्यास केला पुणे येथील राहिलेल्या अभ्यासाच्या उणिवा दिल्ली येथे दुर होत गेल्या आईचे स्वप्न कुटुंबाची साथ भक्कम आत्मविश्वास सातत्याने केलेल्या अभ्यासाने चौथ्या प्रयत्नात हे यश संपादित केले तर भविष्यात पुन्हा परिक्षा देऊन आय एस होणार असल्याचे गौरवोद्गार ऋषीकेशने गावच्या सत्काराला उत्तर देताने काढले तर आजच्या तरुणांनी स्पर्धा परिक्षेच्या तयारीकडे लक्ष देऊन उच्च पदावर जाण्याचे स्वप्न पाहिले पाहिजे असे सांगत सर्वांचे मनापासुन आभार मानले.
-कसा केला अभ्यास?
माझा हा चौथा प्रयत्न होता,जास्त शिकवण्या लावल्या नाही.परंतु,केंद्रीय परीक्षांचा अभ्यास करणारे तसेच सेवेत असलेल्या वरिष्ठांनी कोणती पुस्तके वाचावी याबाबत मार्गदर्शन केले.इंग्रजी वृत्तपत्रासह मराठी दैनिके वाचले, त्याचबरोबर संपादकिय पानावर येणारे लेख व घटनांच्या नोंदी घेतल्या.स्पर्धा खूप असली तरी चिकाटीने अभ्यास केला की यश मिळते.अभ्यासाची पद्धत याबाबतही मिळालेल्या मार्गदर्शनाचा फायदा झाला.
ऋषिकेश गायकवाड
-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा.यांच्याकडून मनस्वी कौतुक
ऋषिकेश राजेंद्र गायकवाड मु.पो.आश्वी खुर्द, ता.संगमनेर,नुकताच आपण केंद्रीय लोकसेवा आयोगा तर्फे घेण्यात आलेल्या परिक्षेत यश संपादन करून ६१० व्या स्थानावर विजय प्राप्त केला आहे त्याबद्दल आपले प्रथमतः कौतुक आणि अभिनंदन ! ग्रामिण भागात राहुन अथक परिश्रम व जिद्ध व सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर परिक्षेत यश संपादन करून ६१० वा क्रमांक मिळवत नावलौकीक मिळविले ही बाब निश्चितच अभिमानास्पद व प्रेरणादायी आहे.आपण केलेल्या उतुंग कामगिरीने निश्चितच प्रवरा परिवाराचा नावलौकिक वाढला आहे.आपल्या यशामध्ये आपले मार्गदर्शक, शिक्षक, आई-वडील, मित्रपरिवार, नातेवाईक यांचा मोलाचा वाटा आहे.आपण आपल्या सेवाकाळात आपले ज्ञान,कौशल्य व नव उपक्रमशिलतेचा अवलंब करत पारदर्शक कार्य कराल आणि राज्याची मान उंचवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
पुनश्चःआपल्या निवडीबद्दल आपले अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा !
नामदार राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य
