श्रीरामपूर दिपक कदम शिवसेना सदस्य नोंदणी अभियान आढावा बैठक शिर्डी लोकसभा निरीक्षक .राजेंद्र चौधरी सदाशिव लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थित बाळासाहेब पवार संपर्क प्रमुख जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपुर येथे पार पडली.
याप्रसंगी शिवसेना बांधकाम कामगार सेनाचे पदांची नियुक्ती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.याप्रसंगी उपस्थित सागर बेग अध्यक्ष राष्ट्रीय श्रीराम संघ, शुभम वाघ युवासेना जिल्हाप्रमुख ,विमल पुंडे महिला आघाडी सुभाष जंगले जिल्हा संघटक, राजेश तांबे
उपजिल्हाप्रमुख ,विशाल शिरसाठ जिल्हाप्रमुख शिवसेना बांधकाम कामगार सेना, प्रदीप वाघ तालुका प्रमुख श्रीरामपुर, उमेश पवार शहर प्रमुख,इम्रान शेख उपजिल्हाप्रमुख शिवसेना बांधकाम कामगार सेना यांच्या सहकार्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे अनुयायी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार भाऊसाहेब चौधरी संपर्क नेते उत्तर महाराष्ट्र, प्रीतम धारिया अध्यक्ष शिवसेना बांधकाम कामगार सेना यांच्या मार्गदर्शनाने शिर्डी लोकसभा बांधकाम कामगार सेनेच्या श्रीरामपुर बांधकाम कामगार
सेना तालुका प्रमुख पदी बाबासाहेब भालेराव, उपतालुकाप्रमुख हारुण शहा, तालुका संघटक पदी घनश्याम सोनवणे,तालुका सचिव संतोष निकम,तालुका समन्वय जालिंदर औटी, उपशहर प्रमुख पदी सुनील सोनवणे,शहर संघटक हसन शहा,शहर सचिव पदी संदीप उंडे यांची निवड करण्यात आली.
शिर्डी लोकसभा निरीक्षक राजेंद्र चौधरी यांनी व मा.खा. सदाशिव लोखंडे यांनी सर्वांना सूचना केली शिवसेना पक्ष व संघटना वाढवावी मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी करावी. सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना भावी वाटचालीस यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या.